ETV Bharat / business

बनावट रेमडेसिवीर इंजेक्शनला आळा घालण्याकरिता झायडसकडून 'स्क्रॅचकोड' - fake covid drugs

झायडसकडून रेमडॅक (रेमडेसेवीर) आणि विराफीन इंजेक्शनचे कोरोनावरील उपचारासाठी उत्पादन घेण्यात येते. या औषधांच्या पॅकेजवर स्क्रॅचकोड असणार आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शन
रेमडेसिवीर इंजेक्शन
author img

By

Published : May 28, 2021, 10:05 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाबाधितांवरील उपचारात वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनमधील भेसळ रोखण्यासाठी झायडस औषध कंपनीने खास पॅकेजिंक केली आहे. त्या पॅकेजिंगमुळे बनावट अथवा भेसळीचे इंजेक्शन नसल्याची ग्राहकांना खात्री करता येमार आहे.

झायडसकडून रेमडॅक (रेमडेसेवीर) आणि विराफीन इंजेक्शनचे कोरोनावरील उपचारासाठी उत्पादन घेण्यात येते. या औषधांच्या पॅकेजवर स्क्रॅचकोड असणार आहे. अशा प्रकारची औषधे ही जूनच्या तिसऱ्या आठवड्यापासून उत्पादित होणार असल्याचे झायडस कॅडिलाने म्हटले आहे. हे फीचर कंपनीच्या इतर औषधांसाठी वापरण्यात येणार आहे.

हेही वाचा-Maratha reservation - संभाजी राजे शिवराज्याभिषेकदिनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट करणार

कंपनीच्या माहितीनुसार पॅकेजिंगवरील स्क्रॅच पाहून रुग्णांना इंजेकश्न खरे असल्याची सत्यता पडताळता येणार आहे. स्क्रॅच केल्यानंतरचा कोड हा कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपमध्ये पाहता येणार आहे.

हेही वाचा-जीएसटी परिषद : कोरोना उपचारावरील औषधांना केंद्रीय जीएसटी माफ- निर्मला सीतारामन

भेसळयुक्त औषध हे हानिकारक-

भेसळयुक्त औषध हे हानिकारक असू शकते, असा इशारा कॅडिला हेल्थकेअरचे व्यवस्थापकीय संचालक शार्विल पटेल यांनी दिला. कॅडिला हेल्थकेअर ही अहमदाबादमधील झायडस कॅडिला ग्रुपची कंपनी आहे. या कंपनीचे जगभरात २५ हजार कर्मचाऱ्यांसह १,४०० शास्त्रज्ञ आहेत.

दरम्यान, रेमडेसेवीरचा तुटवडा निर्माण झाला असताना बनावट इंजेक्शन विकण्यात आल्याचे प्रकार समोर आले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.