नवी दिल्ली - फेसबुक इंडियाने दिल्ली, गुरुग्राम, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरूमधील लघू व्यवसायांसाठी ३२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. यामध्ये रोख रकमेसह आणि जाहिरातीसाठी लागणाऱ्या रकमेचा समावेश आहे.
फेसबुकने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील लघू व्यवसायांसाठी १०० दशलक्ष डॉलरची मदत करण्याचे जाहीर केले होते. हा प्रोग्रॅम सर्व लघू व्यवसायांना आणि उद्योगांना खुला आहे. त्यासाठी त्यांच्याकडे फेसबुकचे अॅप असावे, अशीही अट नाही. त्यांची काय इच्छा हे सांगण्यासाठी ते खुले आहेत, असे फेसबुकचे व्यस्थापकीय संचालक अजित मोहन यांनी सांगितले.
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने व्यवसायांसाठी गिफ्टकार्ड सुरू केले आहेत. गिफ्टकार्डचा वापर करून छोट्या व्यवसायांना ग्राहकांना अधिक प्रमाणात पोहोचणे शक्य होणार आहे. त्यामुळे त्यांना दुकाने अधिक प्रमाणात उत्पन्न मिळविणे शक्य होणार आहे.
फेसबुकने लघू व्यवसायांच्या स्थिती दर्शविणारा अहवाल हा इकॉनिमिक ऑपरेशन अॅण्ड डेव्हलपमेंट (ओईसीडी) आणि वर्ल्ड बँकच्या सर्वेक्षणाच्या मदतीने तयार केला आहे. या अहवावात कोरोनाचा लघू व्यवसायांवर काय परिणाम झाला, याची माहिती देण्यात आली आहे. फेसबुकने एप्रिलमध्ये रिलायन्समध्ये ४३ हजार ५७४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.