ETV Bharat / business

इंटरकनेक्ट युझेज चार्जेस रद्द करण्याची जिओकडून पुन्हा मागणी; भारती एअरटेलचा विरोध

इंटरकनेक्ट युझेज चार्जेस काढून टाकण्यावरून पुन्हा एकदा रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल या दोन्ही कंपन्यांमधील वाद समोर आला आहे.

प्रतिकात्मक
author img

By

Published : Nov 15, 2019, 5:34 PM IST

Updated : Nov 15, 2019, 6:39 PM IST

नवी दिल्ली - दोन नेटवर्कमधील 'इंटरकनेक्ट युझेज चार्जेस' (आययूसी) 20 जानेवारीपासून शून्य करण्याची मागणी रिलायन्स जिओने केली आहे. अन्यथा मोफत कॉलिंगची सेवा आणि परवडणाऱ्या दूरसंचार सेवेवर परिणाम होईल, असे रिलायन्स जिओचे संचालक महेंद्र नहाटा यांनी म्हटले. ते दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) खुल्या मंचमध्ये (ओपन हाऊस) बोलत होते. तर भारती एअरटेलने इंटरकनेक्ट युझेज चार्जेस काढून टाकण्याला विरोध केला आहे.

दोन नेटवर्कमधील 'इनकमिंग' आणि 'आउटगोईंग' कॉलची संख्या सारखीच होत आहे. त्यामुळे शून्य मोबाईल टर्मिनेशन चार्जच्या अंमलबजावणीला उशीर करण्याचे काहीच कारण नसल्याचे रिलायन्स जिओचे संचालक महेंद्र नहाटा यांनी म्हटले. एअरटेलने 4 जी नेटवर्कचा विस्तार केला आहे. व्होडाफोन आयडियाही 4 जी नेटवर्कच्या विस्तार करण्याबाबत बोलत आहेत. सबस्क्राबईरची ट्रॅफिक ही 2 जी आणि 3 जी नेटवर्कवर वळविण्यात येत असल्याचा त्यांनी दावा केला. इंटरकनेक्ट चार्जेस हे प्रति 6 पैशांपर्यंत कमी आणावे, अशी त्यांनी मागणी केली.

हेही वाचा-जिओच्या ग्राहकांना पहिल्यांदाच कॉलिंगकरिता मोजावे लागणार पैसे; 'हा' आहे नवा दर

इंटरकनेक्ट युझेज चार्जेस हे शून्यापर्यंत कमी होऊ नये, अशी अपेक्षा एअरटेलने व्यक्त केली. तर बीएके ( बिल अँड कीप) साम्राज्य हे तीन वर्षापर्यंत पुढे लांबणीवर टाकावे, असेही एअरटेल म्हटले आहे. देशातील 40 कोटी ग्राहक 2 जी नेटवर्कचा उपयोग करत असल्याचे भारती एअरटेलचे मुख्य नियामक अधिकारी रवी गांधी यांनी म्हटले आहे. हे ग्राहक कमी फीचर्स असलेल्या फोनचा वापर करतात. 2 जी नेटवर्कचा वापर रोखणे, म्हणजे त्या ग्राहकांना दूरसंचार सेवांपासून परावृत्त करण्यासारखे असल्याचे गांधी यांनी म्हटले.

संबंधित बातमी वाचा-जीओचा एअरटेल, व्होडाफोन आयडियावर फसवणुकीचा आरोप; जाणून घ्या, काय आहे नेमके प्रकरण

काय आहे इंटरकनेक्ट युजेस चार्ज

एका दूरसंचार ऑपरेटच्या क्रमांकावरून दुसऱ्या कंपनीच्या दूरसंचार ऑपरेटच्या मोबाईल क्रमांकावर कॉल केल्यास शुल्क आकारण्यात येते. हे इंटरकनेक्ट युजेस चार्ज (आययूसी) म्हणून आकारण्यात येते. ट्रायने 2017 मध्ये 17 पैशांवरून इंटरकनेक्ट युसेज चार्ज हे 6 पैसे केले आहे. हे शुल्क जानेवारी 2020 मध्ये बंद करण्यात येणार असल्याचे ट्रायने जाहीर केले आहे. मात्र, ही मुदत वाढविण्याबाबत ट्राय सध्या विचार करत आहे.

Intro:Body:

Dummy Business News

Conclusion:
Last Updated : Nov 15, 2019, 6:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.