नवी दिल्ली - सर्व कंपन्यांचा कॉर्पोरेट कर १५ टक्क्यापर्यंत कमी करावा, असे उद्योगांची संघटना सीआयआयने केंद्र सरकारला सूचविले आहे. हा कर तीन वर्षांपर्यंत कमी केल्याने मागणी आणि वृद्धीदर वाढेल, अशी अपेक्षा सीआयआयने व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने वैयक्तिक प्राप्तिकरही कमी करावा, असेही सीआयआयने म्हटले आहे.
केंद्रीय महसूल सचिव अजय भूषण पांडे आणि भारतीय उद्योग महांसघाचे (सीआयआय) अध्यक्ष यांच्यात अर्थसंकल्पपूर्व बैठक संपन्न झाली. यामध्ये सीआयआने मागणी आणि गुंतवणूक वाढविण्यासाठी शिफारसी केल्या आहेत.
हेही वाचा-एनईएफटीची सेवा १६ डिसेंबरपासून २४X७ - आरबीआयचा निर्णय
- सर्व करात एकसमानता येण्यासाठी सर्व कॉर्पोरेट कर हा १५ टक्क्यापर्यंत असावा, असे सीआयआने सूचविले आहे.
- पीक लागवडीकरता शेतकऱ्यांना थेट लाभ हस्तांतरणातून ४ हजार रुपये द्यावेत, असेही सीआयआयने म्हटले आहे.
- पायाभूत सुविधा, ग्रामीण भागातील मागणी व खासगी गुंतवणूकीला चालना वाढविण्यासाठी सरकारने वित्तीय जागा (फिस्कल स्पेस) तयार करावी, असे सीआयआयने म्हटले.
- मागणी वाढविण्यासाठी पिरॅमिडच्या तळाशी असलेल्या लोकांचे उत्पन्न वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारने प्राप्तिकर कर कमी करावा, अशी सूचना सीआयआयने सरकारला केली आहे.
हेही वाचा-जैविक इंधनांचा वापर होवू शकणारी वाहने कंपन्यांनी विकसित करावीत -नितीन गडकरी
केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कॉर्पोरेट कर हा ३० टक्क्यांवरून २२ टक्के केला आहे. तर नव्या उत्पादक कंपन्यांना कॉर्पोरेट कर हा १५ टक्के लागू करण्यात आला आहे. हा कॉर्पोरेट कर गेल्या सहा वर्षात सर्वात कमी आहे.