नवी दिल्ली- जागतिक आर्थिक महासत्ता असलेल्या चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे एक हजांराहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. चीनवर संकट असताना भारतामधील उद्योगावरही परिणाम होण्याची भीती आहे.
चालू आर्थिक वर्षातील शेवटचे पतधोरण जाहीर करताना भारतीय रिझर्व्ह बँकेने कोरोना विषाणूचा पर्यटनासह व्यापारावर होणार परिणाम असल्याची शक्यता व्यक्त केली होती. आयएचआयएस मर्किटच्या अहवालानुसार कोरोनाचा जागतिक आर्थिक व्यवस्थेवर सार्सहून अधिक वाईट परिणाम होणार आहे.
हेही वाचा- 'कोरोना व्हायरस'ला COVID-19 नावं देण्यामागे काय आहे कारण?
- औषध उद्योग - औषध निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या चीनमधून होणाऱ्या निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अँटिबायोटिक आणि विटामिनच्या औषध निर्मितीसाठी भारत आयातीवर अवलंबून आहे.
- कुक्कुटपालन उद्योग-चिकनमुळे कोरोना होत असल्याच्या समाजमाध्यमातून अफवा पसरली होती चिकनमुळे कोरोना विषाणू पसरत असल्याचा कोणताही पुरावा समोर पुढे आला नसल्याचे पशुसंवर्धन मंत्रालयाचा खुलासा केला आहे.
- वैयक्तिक संरक्षणाच्या साधनांची निर्यात- एन-९५ चे मास्क, हातमोजे आणि इतर वैयक्तिक संरक्षणाच्या साधनांच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे.
- अन्नपदार्थ आयात बंदी- चीन आणि इतर देशांमधून आयात होणाऱ्या हवाबंद पॅकिंगच्या अन्न पदार्थावर मणिपूर सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे.
- कापूस निर्यात - महाराष्ट्रातून कापसाची चीनमध्ये होणारी निर्यात थंडावली आहे. देशात कापसाच्या ३ लाख गाठी देशात पडून आहेत.
- प्रवास क्षेत्रावर परिणाम-कोरोना विषाणुमुळे चीनमधून भारतात येणारे आणि भारतामधून चीन जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे.
- मोबाईल निर्मिती क्षेत्रावर परिणाम-मोबाईल उद्योगाकडून दरवर्षी ९५ हजार कोटी रुपयांच्या सुट्ट्या भागांची चीनमधून आयात करण्यात येते. हँडसेट उत्पादक कंपन्या चीनमधील कारखाने उघडण्याची प्रतीक्षा आहे.
- वाहन उद्योगावर परिणाम - देशातील वाहन उद्योगांसाठी लागणाऱ्या सुट्ट्या भागांची चीनमधील वुहान शहरामधून निर्यात होते. वुहानमधील उद्योग ठप्प झाल्याने भारतीय वाहन उद्योगावर परिणाम होण्याची भीती आहे.
- इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रावर परिणाम- कोरोनाचे प्रमाण कमी झाले नाही तर उद्योगावर मोठे संकट येईल, अशी इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनने शक्यता व्यक्त केली आहे.
हेही वाचा-केजरीवाल यांच्या 'अर्थपूर्ण' कामगिरीचा विजयासाठी 'असा' झाला फायदा