ETV Bharat / business

स्वेच्छा निवृत्तीकरिता बीएसएनएल कर्मचाऱ्यांचे चारच दिवसात ५० हजार अर्ज - भारत संचार निगम स्वेच्छा निवृत्ती योजना

बीएसएनएलला ८३ हजार कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छा निवृत्तीचे अर्ज भरण्याचे उद्दिष्ट देण्यात आल्याचे केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाचे सचिव अंशू प्रकाश यांनी सांगितले. तर एमटीएनएलला ३० हजार कर्मचाऱ्यांपैकी १५ हजार कर्मचाऱ्यांच्या व्हीआरएसचे उद्दिष्ट देण्यात आले आहेत.

संपादित- बीएसएनएल व एमटीएनएल
author img

By

Published : Nov 8, 2019, 6:59 PM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकारने बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांसाठी आणलेल्या स्वेच्छा निवृत्ती योजनेला (व्हीआरएस) कर्मचाऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. बीएसएनएलच्या ५० हजार कर्मचाऱ्यांनी केवळ चारच दिवसात स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केले आहेत. तर एमटीएनएलच्या ३ हजार कर्मचाऱ्यांनी अर्ज केले आहेत.

बीएसएनएलला ८३ हजार कर्मचाऱ्यांच्या स्वेच्छा निवृत्तीचे अर्ज भरण्याचे उद्दिष्ट देण्यात आल्याचे केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाचे सचिव अंशू प्रकाश यांनी सांगितले. तर एमटीएनएलला ३० हजार कर्मचाऱ्यांपैकी १५ हजार कर्मचाऱ्यांच्या व्हीआरएसचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. स्वेच्छा निवृत्ती योजना ही चांगली आहे. कर्मचाऱ्यांनी ही योजना चांगली स्वीकारल्याचे अंशू प्रकाश यांनी सांगितले.

हेही वाचा-एनईएफटीचे ऑनलाईन व्यवहार जानेवारीपासून होणार विनाशुल्क; आरबीआयची बँकांना सूचना

बीएसएनएल कंपनीमध्ये १.७५ लाख मनुष्यबळ कार्यरत आहे. कंपनीच्या एकूण महसुलातील ७५ टक्के खर्च हा मनुष्यबळावर खर्च होतो. गेली दहा वर्षे बीएसएनएल ही तोट्यात आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये बीएसएनएलला १४ हजार ३०० कोटींचा तोटा झाला आहे.

हेही वाचा-आणखी नोटांबदी करण्याची 'या' वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली गरज

अशी आहे स्वेच्छा निवृत्ती योजना-

  • ज्या कर्मचाऱ्यांचे ५३.५ वर्षांहून अधिक वय आहे, त्यांना वेतनाच्या १२५ पट पैसे दिले जाणार आहेत. हे वेतन त्यांना उर्वरित सेवेत मिळविता आले असते.
  • ज्या कर्मचाऱ्यांचे वय ५० ते ५३.५ वर्षे आहे, त्यांना वेतनाच्या ८० ते १०० टक्के पैसे दिले जाणार आहेत. ज्या कर्मचाऱ्यांचे वय ५५ वर्षांहून अधिक आहे, त्यांना ६० वर्षानंतर पेन्शन लागू होणार आहे.
  • ज्यांचे वय ५५ वर्षे अथवा त्याहून कमी आहे, त्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार २०२४-२५ पर्यंत पेन्शन देण्यात येणार आहे.

Intro:Body:

body

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.