हैदराबाद - भारत बायोटेककडून कोरोनाविरोधातील २ कोटी कोव्हिक्सिनचा ब्राझीलला पुरवठा करण्यात येणार आहे. हा पुरवठा चालू वर्षात दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत केला जाणार असल्याचे भारत बायोटेकने म्हटले आहे.
भारत बायोटेकने ब्राझिलियन सरकारबरोबर करार केला आहे. या करारानुसार देशामध्ये विकसित झालेल्या भारत बायोटेकच्या लशीचा ब्राझीलला पुरवठा करणार आहे.
हेही वाचा-आठ पायाभूत क्षेत्रांच्या उत्पादनात जानेवारीत ०.१ टक्क्यांची वाढ
भारत बायोटेकने म्हटले आहे की, ब्राझीलच्या कोरोनाविरोधातील लढ्यात सहभागी होताना कंपनीला आनंद होत आहे. जगभरातील विविध देशांनी कोव्हॅक्सिनमध्ये रस दाखविला आहे. कंपनी त्या देशांना वेळेवर आणि कार्यक्षमतेने पुरवठा करण्यासाठी बांधील आहे. भारत बायटेकने ब्राझीलच्या प्रेसिसा मेडिकेमेन्टोस कंपनीबरोबर करार केला आहे. या करारानुसार कोव्हॅक्सिनचा कंपनीकडून दक्षिण अमेरिकेत पुरवठा करण्यात येणार आहे.
हेही वाचा-ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीत जीडीपीत ०.४ टक्क्यांची वाढ
कोव्हॅक्सिन ही स्वदेशी कोरोना लस विकसित करणाऱ्या भारत बायोटेकला नुकतेच तेलंगाणा सरकारने 2021 चा जेनोम व्हॅली एक्सलन्स पुरस्कार प्रदान केला. तेलंगाणाचे आयटी मंत्री के.टी. रामाराव यांनी भारत बायोटेकचे एमडी कृष्णा इल्ला आणि जेएमडी सुचित्रा इल्ला यांना हा पुरस्कार प्रदान केला.
हैदराबादमध्ये वीस कोटी लसींची क्षमता..
सध्या कंपनीच्या हैदराबादमधील शाखेत वीस कोटी लशींचे उत्पादन (वार्षिक) घेण्याची क्षमता आहे. तसेच, देशात इतर शहरांमध्येही आम्ही मॅनफ्रॅक्चरिंग युनिट उभारत आहोत, ज्यांची एकत्रित क्षमता ५० कोटी लसींचे उत्पादन घेण्याची असेल, असे भारत बायोटेकचे एमडी कृष्णा इल्ला यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते.