नवी दिल्ली - सरकारी बँकांमधील बँकिंग सेवा उद्या विस्कळित होण्याची शक्यता आहे. कारण देशातील १० केंद्रीय व्यापारी संघटनांनी उद्या देशव्यापी संप पुकारला आहे.
सिडिंकेंट बँकेसह इतर बँकांनी कामगार संघटनांचा देशव्यापी संप होणार असल्याची माहिती मुंबई शेअर बाजाराला दिली आहे.
हेही वाचा-पीएमसी घोटाळ्यानंतर आरबीआयने नागरी सहकारी बँकांसाठी केला नवा नियम
या संघटना संपात होणार सहभागी-
आयएनटीयूसी, एआयटीयूसी, एचएमएस, सिटू, एआययूटीयूसी, टीयूसीसी, सेवा, एआयसीसीटीयू, एलपीएफ, यूटीयूटीस या केंद्रीय व्यापारी संघटना संपात सहभागी होत आहेत. यासह विविध संघटनांही संपात सहभागी होणार आहेत.
हेही वाचा-'रिलायन्स'ला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा; केंद्र सरकारची फेटाळली 'ही' याचिका
काय म्हटले आहे केंद्रीय व्यापार संघटनांनी संयुक्त निवेदनात ?
- कामगार मंत्रालायने जानेवारी २०२० ला बैठक बोलाविली होती. मात्र, कामगार मंत्रालय हे कामगारांना आश्वासन देण्यात अपयशी ठरले आहे.
- काही विद्यापीठांच्या अधिकाऱ्यांच्या संघटना आणि सुमारे ६० विद्यार्थी संघटनांनी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षणाचे व्यापारीकरण आणि वाढते शिक्षण शुल्क याला विरोध करण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
- केंद्रीय कामगार संघटनांनी जेएनयूमधील हिंसाचाराचा आणि इतर विद्यापीठातील घटनांचा निषेध केला. देशभरातील विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत एक असल्याची भावनाही व्यापारी संघटनांनी व्यक्त केली.
- केंद्र सरकारने जूलै २०१५ पासून भारतीय कामगार परिषद आयोजन केली नाही. त्याबाबतही संघटनांनी नाराजी व्यक्त केली.