नवी दिल्ली - आगामी सणाच्या तोंडावर बँक ऑफ महाराष्ट्राने ग्राहकांना खूशखबर दिली आहे. बँक ऑफ महाराष्ट्राने किरकोळ कर्ज (रिटेल लोन ) हे रेपो दराशी संलग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने ग्राहकांना कमी व्याजदरात कर्ज मिळणार आहे.
बँक ऑफ महाराष्ट्राचे रेपो दर्जाशी संलग्न असलेले कर्ज हे १ स्पटेंबर २०१९ पासून उपलब्ध होणार आहे. नव्या ग्राहकांनाच ही सुविधा मिळणार आहे. यापूर्वीच बँक ऑफ महाराष्ट्राने गृहकर्ज हे रेपो दराशी संलग्न केले आहे. रेपो दराशी किरकोळ कर्ज संलग्न केल्याने आरबीआयच्या रेपो दरातील कपातीचा ग्राहकांना थेट लाभ होणार आहे. ग्राहकांना किरकोळ कर्जासाठी कमी व्याजदर लागू होणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रेपो दराशी संलग्न असलेल्ये कर्ज बँकांकडून देण्यात येणार असल्याचे शुक्रवारी म्हटले होते.
सरकारी बँकांची पुण्यात परिषद-
दरम्यान, येत्या पाच वर्षात देशाची अर्थव्यवस्था ५ लाख कोटी डॉलरची करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी देशातील १८ विविध सरकारी बँकांचे वरिष्ठ अधिकारी पुण्यात परिषदेसाठी आले होते.