नवी दिल्ली - बजाज ऑटोने आपल्या उत्पादनामधील सर्वात कमी किमतीची दुचाकी बाजारपेठेत आणली आहे. या सीटी ११० मॉडेलची किंमत ३७,९९७ रुपये आणि ४४, ४८० रुपये किंमत (दिल्ली शोरुम) आहे.
बजाज ऑटोचे अध्यक्ष सारंग कानडे म्हणाले, ज्या ग्राहकांना मजबूत व वाजवी किमतीत दुचाकी हवी त्यांच्यासाठी सीटीचे मॉडेल आहे. सीटी ११० ही मायलेज आणि पॉवर या दोन्हीमध्ये दर्जेदार कागमिरी करेल, असा विश्वास आहे. सीटी श्रेणीमधील ५० लाख दुचाकींची विक्री झाल्याचे त्यांनी सांगितले.
खराब रस्त्यातही दुचाकीचे सस्पेन्शन चांगले काम करते. तसेच क्रॅश गार्ड हे अधिक मजबूत आणि मोठे आहेत. या दुचाकीला ११५ सीसीचे इंजिन आहे. किक स्टार्ट दुचाकीची किंमत ३७ हजार ९९७ रुपये किंमत आहे. तर इलेक्ट्रिक स्टार्ट दुचाकीची किंमत ४४ हजार ४८० रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) आहे.