नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्रालयाने २० एप्रिलनंतर टाळेबंदी शिथील करूनही वाहन कंपन्यांनी उत्पादन सुरू केले नाही. वाहनांच्या सुट्ट्या भागांची कमतरता व विस्कळित झालेली पुरवठा साखळी या कारणांनी वाहनांचे उत्पादन ठप्प आहे.
कोरोनाच्या संकटामुळे टाळेबंदी घोषित केल्यानंतर देशातील सर्वच वाहन कंपन्यांनी जवळपास महिनाभर उत्पादन स्थगित केले आहे. वाहनांचे सुट्टे उत्पादन करणाऱ्या कंपन्याही कारखाने बंद ठेवले आहेत. देशातील सर्वात मोठी वाहन कंपनी मारुती सुझुकी इंडिया (एमएसआय) हरयाणामधील दोन काऱखान्यांमधून उत्पादन घेण्यावर विचार करत आहे.
हेही वाचा- दिलासादायक तंत्रज्ञान! स्वदेशी पीपीईची हरियाणातील विद्यापीठाकडून निर्मिती
कारखान्यांचे काम सुरू करण्यासाठी वाहनांच्या सुट्ट्या भागांची गरज आहे. त्याची देशात किती उपलब्धता आहे, हे व्यवस्थापनाकडून पाहिले जात आहे. काही दिवसांमध्ये उत्पादन सुरू होईल, अशी आशा असल्याचे एमएसआयचे चेअरमन आर. सी. भार्गव यांनी सांगितले.
हेही वाचा-ब्राह्मोस क्षेपणास्त्र एअरोस्पेसकडून पीपीई किटसह एन-९५ मास्कची मदत
पुरवठा साखळी सुरू होण्याची गरज असल्याचे टोयोटा किर्लोस्करचे प्रवक्त्याने सांगितले. टाळेबंदीने वाहनांची शोरुम बंद असताना कंपन्यांनी वाहनांचे उत्पादन सुरू करण्यात काही अर्थ नाही, असे बाजारपेठ विश्लेषकांचे मत आहे.