नवी दिल्ली - चालू वर्षात वाहन उद्योगाने अभूतपूर्व मंदी अनुभवली आहे. आगामी आर्थिक वर्षात बीएस-६ वाहनांचा वापर बंधनकारक असणार आहे. त्यामुळे वाहन उद्योगातील मंदी पालटेल असा विश्वास उद्योगामधून व्यक्त करण्यात येत आहे.
देशाची मंदावलेली अर्थव्यवस्था सावरेल, अशी उद्योगाला आशा आहे. ग्राहक पुन्हा शोरुममध्ये वाहन खरेदीसाठी परततील, अशीही उद्योगाला आशा आहे. वाहनांची इंजिन क्षमता बीएस-४ वरून बीएस-६ करताना वाहन उद्योगाला आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. वाहन इंजिनच्या नव्या निकषामुळे वाहनांच्या किमती वाढणार आहेत.
देशातील सर्वात मोठे द्वैवार्षिक ऑटो प्रदर्शन फेब्रुवारीमध्ये होणार आहे. हे प्रदर्शन वाहन उद्योगासाला चालना देणारे मानले जाते. मात्र, यंदा वाहन उद्योगाला दिवाळी-दसरा अशा सणातही मंदीचा फटका बसला आहे.
हेही वाचा-...म्हणून फोक्सवॅगनला ऑस्ट्रेलियाच्या न्यायालयाकडून ६१२ कोटी रुपयांचा दंड
दुचाकी ते मालवाहू ट्रक अशा सर्व श्रेणीतील वाहनांच्या विक्रीत घसरण झाली आहे. चालू आर्थिक वर्षात सर्व वाहनांच्या घाऊक विक्रीत १३ ते १७ टक्के घसरण होईल, अशी उद्योगाला भीती आहे. चालू वर्षात सर्वच वाहन कंपन्यांनी उत्पादन प्रकल्प काही दिवसांसाठी स्थगित ठेवले होते. डीलरशिप आणि वाहनांच्या सुट्ट्या भांगाचे उत्पादन करणाऱ्या उद्योगातील सुमारे ३.५ लाख कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत.
हेही वाचा-वाहन उद्योगातील मंदीचा जीएसटी संकलनावर परिणाम
कठीण काळातून जात असतानाही आगामी वर्ष आशादायी असेल, असे एसआयएएम (इंडस्ट्री बॉडी सोसायटी ऑफ इंडिय ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चुअर्स) या संघटनेला वाटते.
एसआयएएमचे अध्यक्ष राजन वढेरा म्हणाले, २०२० हे उत्साही वर्ष असणार आहे. बीएस-६ ची अंमलबजावणी होत असल्याने बाजारपेठेला नवा प्लॅटफॉर्म मिळणार आहे.
दरम्यान, जानेवारीपासून ह्युदांई, टाटा मोटर्स, निस्सान इत्यादी कंपन्यांना वाहनांच्या किमती वाढविल्याचे जाहीर केले आहे.