ETV Bharat / business

कोरानाचा प्रसार वाढल्याने इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनी ३१ मार्चपर्यंत थांबविले उत्पादन

दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने मोबाईल, फ्रिज वॉशिंग मशिनचे नोएडा आणि चेन्नईमधील उत्पादन थांबविले आहे. सॅमसंग इंडियाचे कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सचे प्रमुख पार्थ घोष म्हणाले, केंद्र सरकारच्या सूचनांप्रमाणे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेण्यात येत आहे.

इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या
इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या
author img

By

Published : Mar 23, 2020, 7:43 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाचा प्रसार वाढत असल्याने इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅप्लाईन्स उत्पादकांनी ३१ मार्चपर्यंत उत्पादन थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यांतील १९ राज्यांमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे.

दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने मोबाईल, फ्रिज वॉशिंग मशिनचे नोएडा आणि चेन्नईमधील उत्पादन थांबविले आहे. सॅमसंग इंडियाचे कॉर्पोरेट कम्युनिकेशन्सचे प्रमुख पार्थ घोष म्हणाले, केंद्र सरकारच्या सूचनांप्रमाणे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची काळजी घेण्यात येत आहे. उत्पादन प्रकल्प, विक्री, विपणन आणि संशोधन-विकासमधील सर्व कर्मचाऱ्यांना काम थांबविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा-कोरोनाचा हाहाकार सुरू असतानाही शेअर बाजार सुरू : गुंतवणूकदारांना 'ही' आहे भीती

देशामधील १९ राज्ये, सर्व केंद्रशासित प्रदेस आणि सहा राज्यांतील काही भागांत लॉकडाऊन करण्यात आले आहे. देशात सुमारे ३९० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जपानी कंपनी पॅनासॉनिकने हरयाणाममधील एसी, फ्रिज आणि वॉशिंग मशीनचे उत्पादन थांबविले आहे. एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाने ग्रेटर नोएडा आणि पुण्यातील उत्पादन प्रकल्पाचे काम थांबविले आहे. हेअर, गोदरेज अप्लायन्सनेही उत्पादनांचे काम थांबविले आहे. कोरोनाची तीव्रता कमी झाल्यानंतर ३१ मार्चला आढावा परिस्थितीचा कंपन्यांकडून आढावा घेण्यात येणार आहे.

हेही वाचा-वित्तिय विधेयकाला चर्चेविना मंजुरी; दिलासादायक पॅकेजची विरोधकांकडून मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.