नवी दिल्ली - अॅमेझॉनने ओनिडाबरोबर फायर टीव्ही बाजारात आणण्यासाठी भागीदारी केली आहे. यामुळे ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अॅमेझॉनला ग्राहकोपयोगी उत्पादनात आणखी जम बसविणे शक्य होणार आहे.
भारत हा स्ट्रीमिंग उत्पादनासाठी आमच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ असलेला देश आहे. याची संपूर्ण देशात वाढ होईल, असा कंपनीने विश्वास व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे टीव्हीलाही प्रतिसाद मिळेल, असा विश्वास फायर टीव्ही डिव्हाईसेस आणि एक्सपिरियन्सचे उपाध्यक्ष संदीप गुप्तांनी व्यक्त केला. यापूर्वी अॅमेझॉनने २०१८ मध्ये फायर टीव्ही असलेला स्मार्ट टीव्ही अमेरिका आणि कॅनडाच्या बाजारपेठेत आणला होता. अॅमेझॉन फायर टीव्हीचे परवाना असलेले तंत्रज्ञान हे टीव्ही कंपन्यांना देण्यावर काम करत आहे.
![Onida Fire tv Smart](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/5339231_amaz.jpg)
हेही वाचा-चालू आर्थिक वर्षात देशाचा जीडीपी ५.१ टक्के राहिल; एडीबी बँकेचा अंदाज
ओनिडा फायर टीव्ही एडिशनमध्ये फायर टीव्हीच्या सुविधा आहेत. यामध्ये ग्राहकांना प्राईम व्हिडिओ, हॉटस्टार, नेटफ्लिक्स आणि इतर कंपन्यांचे व्हिडिओ पाहणे शक्य होणार आहे. अॅमेझॉन फायर टीव्ही स्ट्रिमिंग स्टीकची देशात विक्री करण्यात येते. तसेच इको (स्मार्ट स्पिकर्स) आणि किंडल या उत्पादनांची अॅमेझॉनकडून विक्री करण्यात येते. जगभरात तिसऱ्या तिमाहीत ३७ दशलक्ष जणांकडून फायर टीव्हीचा वापर करण्यात येत असल्याचा अॅमेझॉनने दावा केला आहे.
हेही वाचा-निस्सान जानेवारीपासून ५ टक्क्यांनी वाढविणार वाहनांच्या किमती
या आहेत स्मार्ट टीव्हीमध्ये सुविधा-
देशामध्ये टीव्ही उत्पादन निर्माण करण्याचा ३८ वर्षांचा अनुभव असल्याचे ओनिडाने म्हटले आहे. स्मार्ट टीव्हीमधून अत्यंत उच्च दर्जाचे चित्र आणि ध्वनीचा ग्राहकांना अनुभव घेता येईल, असे ओनिडाचे व्यवसाय प्रमुख सुनील शंकर यांनी सांगितले. या एचडी टीव्हीमध्ये वायफाय, ३ एचडीएमआय पोर्टस, १ यूएसबी पोर्ट आणि १ एअरफोन पोर्टची सुविधा आहे.
अशा आहेत ओनिटा फायर टीव्ही स्मार्टची किमती-
ओनिडा फायर टीव्ही स्मार्ट हा ३२ इंचीमध्ये १२ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध असणार आहे. तर ४३ इंचचा फायर टीव्ही स्मार्ट हा २१ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध असणार आहे. ही स्मार्ट टीव्ही अॅमेझॉनवर २० डिसेंबरपासून ग्राहकांना खरेदी करणे शक्य होणार आहे.
फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनमध्ये होणार कट्टर स्पर्धा-
नुकतेच वॉलमार्टची मालकी असलेल्या फ्लिपकार्टने मोटोरोला आणि नोकियाबरोबर स्मार्ट टीव्ही आणण्यासाठी करार केला आहे. तसेच मार्क्यूब्रँडचे स्मार्ट टीव्ही फ्लिपकार्टवरून विकण्यात येत आहेत. ओनिडाबरोबर स्मार्ट टीव्हीसाठी भागीदारी केल्याने अॅमेझॉनची फ्लिपकार्टबरोबर तगडी स्पर्धा निर्माण होणार आहे.