चेन्नई - ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने वर्षभरातून आयोजित करण्यात येणारा प्राईम डे सेल जाहीर केला आहे. हा सेल २६ ते २७ जुलैला होणार आहे. या दोन दिवसांमध्ये लघू आणि मध्यम व्यवसायांसह आघाडीच्या ब्रँडकडून नवीन उत्पादने लाँच करण्यात येणार आहेत.
भारतासह जगभरातील आघाडीच्या ब्रँडची ३०० हून अधिक उत्पादने लाँच होणार आहेत. यामध्ये सॅमसंग, शाओमी, बोट, इंटेल, विप्रो, बजाज, युरेका, फोर्ब्स, आदिदास आणि इतर ब्रँडचा समावेश आहेत. ही नवीन उत्पादने प्राधान्याने प्राईम मेंबरला उपलब्ध होणार आहेत.
हेही वाचा-मोदी मंत्रिमंडळ २.० : नवीन केंद्रीय मंत्र्यांनी स्वीकारला पदभार
- १० लाखांहून अधिक कारागीर आणि विणकाम, अॅमेझॉनल सहेलीमधील ६ लाख ८० हजारांहून अधिक महिला आंत्रेप्रेन्युअर प्राईम डेमध्ये उत्पादने विक्रीला ठेवणार आहेत.
- याशिवाय स्थानिक दुकानदरा आणि देशातील लाखो विक्रेते त्यांची उत्पादने अॅमेझॉन लाँचपॅडला विक्रीसाठी उपलब्ध करणार आहेत.
- लघू आणि मध्यम व्यवसायांच्या वर्गवारीत २ हजारांहून अधिक नवीन उत्पादने लाँच होणार आहेत. यामध्ये अॅक्शन प्रो, फॅशन प्रोडक्ट्स, ज्वेलरी सेट, खादी, हातमाग उत्पादने आदींचा समावेश आहे.
- प्राईम डे दिवशी जगभरात गाजलेले वर्ल्ड प्रिमीयर प्राईम व्हिडिओ हे विविध भाषांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहेत. हिंदीत तुफान, मल्याळममध्ये मालिक, कन्नडमध्ये इक्कत आणि तामिळमध्ये सरपट्टा पारमबराई हे सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहेत.
हेही वाचा-केंद्रीय मंत्रिमंडळ निर्णय: कोरोनाच्या लढाईविरोधात २३ हजार कोटींचे आरोग्य पॅकेज जाहीर
दरम्यान, सीएआयटी या व्यापारी संघटनेने ई-कॉमर्स कंपन्यांकडून जाहीर करण्यात येणाऱ्या बंपर सवलतीबाबत आक्षेप घेतला होता. तरीही ई-कॉमर्स कंपन्यांकडून सेल जाहीर करण्यात येतात.