नवी दिल्ली - एकेकाळी मोबाईलमध्ये आघाडीवर असलेल्या नोकियाने कोरोनाच्या संकटातही मोठी व्यावसायिक मजल मारली आहे. येत्या काळात ५ जीचे तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी एअरटेलने नोकियाला साडेसात हजार कोटींचे कंत्राट दिले आहे.
नोकियाच्या '५ जी' तंत्रज्ञानाने भारती एअरटेलची नेटवर्क क्षमता वाढणार आहे. तसेच ग्राहकांना आणखी चांगल्या सेवेचा अनुभव घेणे शक्य होणार असल्याचे भारती एअरटेलने म्हटले आहे.
हेही वाचा-करवाढीची शिफारस करणाऱ्या 'त्या' महसूल अधिकाऱ्यांवर मोदी सरकारचे आरोपपत्र
सिंगल रेडिओ अॅक्सेस नेटवर्क (एसआरएएन) तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी भारती एअरटेलने नोकियाबरोबर काही वर्षांचा करार केला आहे. हे तंत्रज्ञान देशातील नऊ सर्कलमध्ये वापरता येणार आहे. नोकियाच्या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने भविष्यातील ५ जीच्या जोडणीची (कनेक्टिव्हिटी) पायाभरणी होणार असल्याचे भारती एअरटेलने म्हटले आहे.
हेही वाचा-करवाढीची शिफारस करणाऱ्या 'त्या' महसूल अधिकाऱ्यांवर मोदी सरकारचे आरोपपत्र