नवी दिल्ली - रिलायन्सने अमर्यादित ब्रॉडबँड प्लॅन जाहीर केल्यानंतर एअरटेलनेही अशाच प्लॅनची घोषणा केली आहे. हा प्लॅन ४९९ रुपयांपासून सुरू होतो. ग्राहकांना अनेक व्हिडीओ एंटरटेनमेंट अॅप आणि काही रक्कम जमा केल्यानंतर हाय डेफिनेशन सेट टॉप बॉक्स मिळणार आहे.
एअरटेलने इंटरनेटची गती ब्रॉडबँड प्लॅनमध्ये २३ पटीने वाढविली आहे. नवीन प्लॅन हा ७ सप्टेंबरपासून १२५ शहरांमध्ये सुरू होणार आहे. त्यानंतर आणखी नवीन शहरांची भर पडणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना ३ हजार गिगाबाईट्सचा डाटा मिळणार आहे.
हेही वाचा-जिओफायबर ग्राहकांना देणार ३० दिवसांचे मोफत ट्रायल कनेक्शन
एअरटेल एक्स्ट्रीम फायबरच्या सर्व प्लॅनमध्ये एअरटेल एक्स्ट्रीम बॉक्स देण्यात येणार आहे. त्याची किंमत ३ हजार ९९९ रुपये आहे. त्यामुळे कोणताही टीव्ही हा स्मार्ट होऊ शकतो. ग्राहकांना सर्व लाईव्ह टीव्ही चॅनेल आणि व्हिडीओ स्ट्रिमिंग अॅपची चांगली सेवा मिळू शकेल, असे एअरटेलने म्हटले आहे. त्यामुळे विविध वेगळे अॅप घ्यावे लागणार नाहीत. या प्लॅनमध्ये अमर्यादित फोन कॉल करणे शक्य आहे. ग्राहकांनी १,५०० रुपये जमा केल्यास ४ हजार रुपयांचा एअरटेल एक्स्ट्रीम टीव्ही बॉक्स मिळू शकणार आहे. ही रक्कम ग्राहकांना परत केली जाणार आहे. एअरटेल एक्स्ट्रीम अॅपमध्ये सात आघाडीची मनोरंजनाचे अॅप आणि पाच स्टुडिओ आहेत. यामधून ग्राहकांना ५५० टीव्ही चॅनेल दिसू शकतील. तर १० हजार चित्रपट आणि एअरटेल एक्स्ट्रीम अॅपमधून शो दिसणार आहे.
हेही वाचा-गुंतवणूकदारांची २०० कोटींची फसवणूक; वेस्टलँड ट्रेडविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
गुगल प्लेस्टोअर अॅपमध्ये ऑनलाइन गेमिंगचा ग्राहकांनापर्याय आहे. कारण, अँड्राईड हे थेट सेटटॉप बॉक्सला जोडता येते. ग्राहकांना हे प्लॅन ९९९ ते ३ हजार ९९९ रुपयांमध्ये आहेत. त्यामध्ये डिस्ने, हॉटस्टार, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि झी ५ आदी मोफत अॅप आहेत.