ETV Bharat / business

लॉकडाऊनमध्ये दिलासा; एअर आशियाचे तिकीट रद्द केल्यासही लागणार नाही शुल्क - AirAsia free rescheduling

पश्चिम बंगालमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत १५ दिवसांचा लॉकडाऊन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घोषित केला आहे. त्यामुळे एअर एशियाने पश्चिम बंगालमधून जाणाऱ्या व येणाऱ्या विमान प्रवासाचे तिकीट रद्द केल्यानंतर शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

AirAsia
एअर आशिया
author img

By

Published : May 17, 2021, 8:43 PM IST

मुंबई - पश्चिम बंगालमध्ये १५ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर एअर आशिया इंडियाने दिलासादायक निर्णय घेतला आहे. विमान प्रवाशांना पश्चिम बंगालवरून जाताना अथवा येताना विमान तिकीट रद्द करणे किंवा वेळेत बदल करताना कोणतेही अतिरिक्त शुल्क एअर एशियाकडून लावण्यात येणार नाही.

पश्चिम बंगालमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत १५ दिवसांचा लॉकडाऊन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घोषित केला आहे. त्यामुळे एअर एशियाने पश्चिम बंगालमधून जाणाऱ्या व येणाऱ्या विमान प्रवासाचे तिकीट रद्द केल्यानंतर शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी एअर एशियाने याच प्रकारचा निर्णय कर्नाटक, दिल्ली, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर घेतला होता.

हेही वाचा-घाऊक बाजारपेठेत महागाईचा उच्चांक; एप्रिलमध्ये १०.४९ टक्क्यांची नोंद

तिकीट रद्द करण्याशिवाय इतरही पर्याय उपलब्ध-

कर्नाटक, दिल्ली आणि तामिळनाडूमध्ये २४ मे रोजी लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. पश्चिम बंगालमध्ये ३० मे रोजीपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. तर महाराष्ट्रात १ जूनपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. ज्या प्रवाशांनी लॉकडाऊनपूर्वी एअर आशियाचे तिकीट बुक केले आहे, त्यांना तिकीट रद्द करणे, बदलणे किंवा इतर विमान प्रवास निवडण्याचा पर्याय असणार आहे. त्यासाठी तिकीट रद्द करण्याचे शुल्क लागू होणार नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा-बिल गेट्स यांच्या महिला कर्मचारीबरोबरील विवाहबाह्य संबंधांचा मायक्रोसॉफ्टने केला तपास

असे एअर एशियाचे रद्द करता येणार तिकीट

एअर आशियाच्या प्रवाशांना कंपनीच्या चॅटबोटमधून तिकीट रद्द करता येणार आहे. हे चॅटबोट एअर आशियाच्या वेबसाईटवर अथवा ९१ ६३६०० १२३४५ या व्हॉट्सअपवर उपलब्ध असणार आहे. या विषयीची सविस्तर माहिती कंपनीच्या वेबसाईटवर मॅनेज या लिंकवर उपलब्ध होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.