नवी दिल्ली - अदानी ग्रुप हा २०२५ पर्यंत जगातील सर्वात मोठी सौर उर्जा कंपनी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे अब्जाधीश गौतम अदानी यांनी जाहीर केले. तर २०३० पर्यंत सर्वात मोठी अपारंपारिक उर्जा कंपनी होण्याचे उद्दिष्ट असल्याचेही अदानी यांनी म्हटले आहे.
अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांनी लिंक्ड इन पोस्टमध्ये कंपनीचे उद्दिष्ट जाहीर केले आहे. अदानी ग्रुप हा २०१९ मध्ये जगातील सौर उर्जा कंपन्यांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर होता. २०२० मध्ये अदानी ग्रुप हा देशातील सर्वात मोठी अपारंपारिक उर्जा कंपनी होण्याच्या मार्गावर आहे. तर २०२१ पर्यंत जगातील पहिल्या तीनमधील सौर उर्जा कंपनी ठरेल, असा अदानी यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
हेही वाचा-'जागतिक व्यापारासाठी सर्वांनी डब्ल्यूटीओला पाठिंबा दिला पाहिजे'
भांडवली बाजाराच्या मूल्यापैकी (कॅपेक्स) ७० टक्के रक्कम ही स्वच्छ आणि उर्जा सक्षम असलेल्या यंत्रणेत गुंतविण्यात येणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-एजीआरचे थकित शुल्क; बिगर दूरसंचार कंपन्यांना मिळणार मुदतवाढीचा दिलासा