ETV Bharat / business

कोरोनाच्या संकटात टीकेचे धनी झालेल्या डब्ल्यूटीओच्या प्रमुखांचा राजीनामा - जागतिक व्यापार

रॉबर्टो अॅझेवेडो यांनी व्हिडिओद्वारे घेतलेल्या बैठकीमध्ये राजीनामा देत असल्याचे डब्ल्यूटीओच्या सदस्यांना सांगितले. पुढील वर्षात १२ व्या मंत्रीय परिषदेची बैठक होत आहे. त्यासाठी नव्या संचालकांना कराव्या लागणाऱ्या तयारीसाठी लवकर राजीनामा देत असल्याचे अॅझेवेडो यांनी बैठकीत सांगितले.

रॉबर्टो अॅझेवेडो
रॉबर्टो अॅझेवेडो
author img

By

Published : May 15, 2020, 12:35 PM IST

संयुक्त राष्ट्रसंघ - जागतिक व्यापार संघटनेचे (डब्ल्यूटीओ) संचालक रॉबर्टो अॅझेवेडो यांनी अचानक राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. कोरोना महामारीमुळे जागतिक व्यापार संकटात असल्याचे डब्ल्यूटीओवर सातत्याने टीका होत आहे.

रॉबर्टो अॅझेवेडो यांनी व्हिडिओद्वारे घेतलेल्या बैठकीमध्ये राजीनामा देत असल्याचे डब्ल्यूटीओच्या सदस्यांना सांगितले. पुढील वर्षात १२ व्या मंत्रीय परिषदेची बैठक होत आहे. त्यासाठी नव्या संचालकांना कराव्या लागणाऱ्या तयारीसाठी लवकर राजीनामा देत असल्याचे अॅझेवेडो यांनी बैठकीत सांगितले.

हेही वाचा-आर्थिक पॅकेजच्या तिसऱ्या टप्प्याची केंद्रीय अर्थमंत्री आज करणार घोषणा

जागतिक व्यापार व्यवस्थेची स्थिती नाजूक झाली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रीस्तरीय परिषदेची बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. रॉबर्टो अॅझेवेडो यांनी यापूर्वी ब्राझीलचे राजदूत आणि अर्थ आणि तंत्रज्ञानाचे उपमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी २०१३ मध्ये डब्ल्यूटीओचे संचालक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.

हेही वाचा-केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पॅकेजमध्ये 'हा' घटक पुन्हा राहिला वंचित

डब्ल्यूटीओने चीनला लाभ मिळवून देणाऱ्या अटी तयार केल्याची टीका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. तसेच जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या चीनला विकसनशील देशाचा दर्जा दिल्यावरूनही ट्रम्प यांनी डब्ल्यूटीओवर टीका केली होती.

हेही वाचा-जागतिक बँकेचा भारताला मदतीचा हात; एवढे देणार अर्थसहाय्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.