ETV Bharat / business

बांधकाम मजुरांसाठी अर्थमंत्री सीतारामन यांचा दिलासादायक निर्णय

author img

By

Published : Mar 26, 2020, 7:26 PM IST

कोरोना विषाणुमुळे लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. निर्मला सीतारामन म्हणाल्या, की लोकांनी घरी राहावे व स्वत: चा जीव धोक्यात घालू नये, यासाठी बांधकाम मजूर निधी देण्यात येणार आहे. काम बंद झाल्यामुळे अनेक बांधकाम मजुरांच्या कामावर परिणाम झाला आहे. हा सामाजिक कल्याण निधी आहे.

निर्मला सीतारामन
निर्मला सीतारामन

नवी दिल्ली - २१ दिवसांच्या लॉकडाऊनमुळे सर्व उद्योग व कामे ठप्प झाली आहेत. अशा स्थितीत बांधकाम मजुरांना सरकारकडून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 'बांधकाम मजूर कल्याण निधी'चा वापर मजुरांसाठी करावा, असे निर्देश राज्यांना देण्यात येणार असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

केंद्र सरकारने तयार केलेल्या नव्या कायद्यानुसार 'बांधकाम मजूर कल्याण निधी' उभा करण्यात आलेला आहे. हा निधी सुमारे ३१ हजार कोटींचा आहे. तर या योजनेत सुमारे ३.५ कोटी मजुरांची नोंदणी करण्यात आली आहे. कोरोना विषाणुमुळे लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. सीतारामन म्हणाले, की लोकांनी घरी राहावे व स्वत: चा जीव धोक्यात घालू नये, यासाठी बांधकाम मजूर निधी देण्यात येणार आहे. काम बंद झाल्यामुळे अनेक बांधकाम मजुरांच्या कामावर परिणाम झाला आहे. हा सामाजिक कल्याण निधी आहे.

हेही वाचा-लॉकडाऊन योग्यच! सोनिया गांधींनी पंतप्रधान मोदींना पत्र पाठवून सुचवले आणखी उपाय..

कोणतेही आर्थिक नुकसान होवू नये, याकरिता बांधकाम मजुरांना मदत करण्यासाठी राज्यांनी निर्देश देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक उद्योग, तज्ज्ञ आणि विकसकांनी बांधकाम मजुरांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा-चिंताजनक..! महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 124, तर मृतांचा आकडा 4 वर

कोरोनाच्या वैद्यकीय उपचारांसाठी जिल्हा खणिकर्म निधी वापरावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच हा निधी वैद्यकीय तपासणी (मेडिकल स्क्रीनिंग), आरोग्याचा गरजांसाठी राज्यांना वापरता येईल, असेही सीतारामन यांनी सांगितले. दरम्यान, कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी वैद्यकीय पायाभूत सुविधा नसल्याने देशामध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा-अखेर मंत्रालयातील उपहारगृह चार दिवसानंतर झाले सुरू; कर्तव्यावरील अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.