नवी दिल्ली - टाळेबंदीच्या काळात व्हिडिओ कॉलिंगचे मागणी वाढत असल्याने व्हॉट्सअॅपने ४ जणांवरून ९ जणांना व्हिडिओ कॉलिंगची सेवा सुरू केली आहे. त्यामुळे झुम या चिनी अॅपबरोबर व्हॉट्सअॅप स्पर्धा करू शकणार आहे.
व्हॉट्सअॅपची ग्रुप कॉलिंग सुविधा ही आयओएस आणि अँड्राईड बिटाच्या वापरकर्त्यांना आहे. त्यासाठी वापरकर्त्याला २.२०.५०.२५ आयओएस बिटा टेस्टफ्लाईटवरून अपडेट करावे लागणार आहे. तर २.२०.१३३ बिटा हे गुगल प्ले स्टोअरवरून अपडेट करावे लागणार आहे.
हेही वाचा-दिलासादायक तंत्रज्ञान! स्वदेशी पीपीईची हरियाणातील विद्यापीठाकडून निर्मिती
हेच व्हर्जन असेल तरच इतरांना व्हॉट्सअॅप कॉलिंगमध्ये सहभागी होता येणार आहे. व्हॉट्सअॅप आणि फेसबुक व्हिडिओ कॉलिंगमध्ये दुप्पट वाढ झाली आहे.
हेही वाचा-राज्यांना कर हिश्याची 'इतके' कोटी केंद्राकडून मिळणार, जाणून घ्या महाराष्ट्राला किती?