ETV Bharat / business

बंद पडलेल्या एलआयसी पॉलिसीचे 'असे' करा नुतनीकरण - LIC latest news

एलआयसीने रद्द झालेल्या विमा योजनांचे नुतनीकरण करण्यासाठी 10 ऑगस्ट ते 9 ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम सुरू केली आहे. यामध्ये ग्राहकांना रद्द झालेल्या विमा योजनांचे नुतनीकरण करता येणार आहे.

संग्रहित -एलआयसी
संग्रहित -एलआयसी
author img

By

Published : Aug 11, 2020, 3:14 PM IST

हैदराबाद – कोरोनाच्या संकटात देशात सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) विमाधारकांना दिला आहे. एलआयसीने बंद पडलेल्या विमा योजनेचे नुतनीकरण करण्यासाठी दोन महिन्यांची विशेष मोहीम सुरू केली आहे.

एलआयसीने रद्द झालेल्या विमा योजनांचे नुतनीकरण करण्यासाठी 10 ऑगस्ट ते 9 ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम सुरू केली आहे. यामध्ये ग्राहकांना रद्द झालेल्या विमा योजनांचे नुतनीकरण करता येणार आहे.

सध्याच्या परिस्थितीत केवळ उशिराचे दंड शुल्क आकारुन विमा योजनेचे नुतनीकरण करून देण्यात येणार आहे. काही पात्र असलेल्या विमा योजनांचे पाच वर्षात नुतनीकरण करता येणे शक्य आहे. त्यासाठी शेवटी भरण्यात आलेल्या विमा हप्त्याच्या दिनांकापासून पुढील पाच वर्षे गृहीत धरण्यात येतात. विमाधारकांना दंडाची रक्कम 20 टक्क्यांनी कमी करण्यात येणार आहे.

पॉलिसी एक्स या वेबसाईटचे सीईओ आणि संस्थापक नवल गोएल म्हणाले, की ज्या ग्राहकांनी 1 जानेवारी 2015 नंतर विमा योजना घेतली आहे, त्यांना बंद पडलेली विमा योजना सुरू करता येणार आहे. कोरोना महामारीत ग्राहकांना वेळेत हप्ता भरण्यात अडचणी येत आहे. अशावेळी ग्राहकांना विमा हप्ता भरणे सोपे व्हावे व उत्पन्नात वाढ होण्यासाठी एलआयसी प्रयत्न करत आहे.

जर तुम्हाला बंद पडलेली विमा योजना सुरू करायची असेल, तर जाणून घ्या सविस्तर माहिती

विमा योजना बंद पडली असल्याचे कधी मानण्यात येते?

जर विमाधारक दिलेल्या वेळेत हप्ता भरू शकला नाही तर त्यासाठी वाढीव कालावधी देण्यात येतो. त्या कालावधीतही विमा हप्ता भरण्यात आला नाही, तर विमा योजना बंद पडते. त्यामुळे ग्राहकाला मिळणारे विमा संरक्षणही बंद पडते.

एलआयली विमा योजनेला वाढीव कालावधी (ग्रेस पिरियड) काय असतो?

विमा हप्ता शेवटच्या तारखेपर्यंतही भरला नाही तर वाढीव कालावधी देण्यात येतो. त्यामध्ये काही दंड आकारून विमा हप्ता भरण्यात येतो. जर वाढीव कालावधीनंतरही विमा हप्ता भरला नाही तर विमा योजना बंद पडते.

एलआयसीकडून विमा हप्ता भरण्याच्या शेवटच्या तारखेपासून 15 दिवसांचा वाढीव कालावधी देण्यात येतो. तर तीन महिन्यांनी, सहा महिन्यांना अथवा एका वर्षाने हप्ता भरणाऱ्या ग्राहकांना 30 दिवसांची वाढीव मुदत देण्यात येते.

एलआयसीच्या विशेष नुतनीकरण मोहिमेत कोणत्या विमा योजना पात्र आहेत?

विमा योजनेचा कालावधी पूर्ण न झालेल्या विमा योजना नुतनीकरणात पात्र ठरतात. मात्र, पहिला विमा हप्ता भरण्यापासून पाच वर्षांहून कमी जुन्या असलेल्या विमा योजनेचे नुतनीकरण करता येणार आहे. त्यासाठी विमा कंपनीकडून काही अटी व शर्ती दिलेल्या असतात.

बंद पडलेल्या एलआयसीचे नुतनीकरण कसे करता येईल?

बंद पडलेल्या विमा योजनेचा हप्ता आणि आरोग्याची माहिती देवून नुतनीकरण शक्य आहे. विमा योजनेचे नुतनीकरण करण्याचे विविध पर्याय आहेत. साधे नुतनीकरण, विशेष नुतनीकरण, हप्त्याने नुतनीकरण असे पर्याय आहेत. ग्राहक त्यांच्या क्षमतेप्रमाणे हप्ता कसा भरता येईल, त्याप्रमाणे नुतनीकरणाचे पर्याय निवडू शकतो.

विमा योजनेच्या नुतनीकरणाची नेमकी प्रक्रिया कशी आहे?

विमा योजनेचे नुतनीकरण करण्यासाठी ग्राहक एलआयसी एजंट अथवा विमा सल्लागार यांच्याशी संपर्क साधू शकतो. ग्राहकांना विमा योजनेच्या नुतनीकरणाचा फॉर्म एलआयसीच्या वेबसाईटवरवरूनही डाउनलोड करता येतो. हा फॉर्म भरून तुम्हाला स्थानिक एलआयसीच्या कार्यालयात जमा करून विमाचे नुतनीकरण करणे शक्य आहे. त्यासोबत थकित रक्कम आणि दंडाची रक्कम ही जमा करावी लागते.

एलआयसीकडून ग्राहकाला नुतनीकरणासाठी काय सवलत देण्यात येत आहे?

कोरोना महामारीत वैद्यकीय अटींसाठी कोणताही सवलत दिली जाणार नाही. मात्र, ग्राहकांना एकूण विमा हप्त्यावर 1,500 रुपये ते 2,500 रुपयांची सवलत दिली जाणार आहे. मात्र, अतिजोखीम असलेल्या आरोग्य विमासारख्या योजोनांवर सवलत दिली जाणार आहे.

तुम्ही बंद पडलेली विमा योजना सुरू करावी का?

नवीन विमा योजना सुरू करण्यासाठी अधिक विमा हप्ता द्यावा लागतो. मात्र, जुन्या विमा योजनेवर दंडाची थोडी रक्कम व हप्ता भरून नव्या विमा योजनेप्रमाणे फायदे मिळविता येतात. नवीन विमा योजनेसाठी पुन्हा वैद्यकीय चाचण्या घेण्यात येतात. त्यामुळे वैद्यकीय चाचणीनंतर पुन्हा विमा हप्त्याची रक्कम वाढण्याची शक्यता असते. तर एखादा आजार आढळला तर विमाही नाकारला जावू शकतो.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.