अबुधाबी - जगभरात कोरोनाचे निदान कमीत कमी वेळेत करण्यासाठी संशोधन सुरू आहे. याबाबत संयुक्त अरब अमिरातीने दिलासादायक संशोधन केले आहे. येथील क्वांटलेझ इमेजिंग लॅबने काही सेकंदात कोरोनाचे निदान देणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
क्वांटलेझ इमेजिंग लॅबने स्क्रीनिंगमधून काही सेकंदात निदान देणार तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यामुळे मोठ्या समुहाचे स्क्रीनिंग करून कोरोनाची चाचणी करता येणार आहे. लॅबमधील संशोधक गटाचे प्रमुख डॉ. प्रमोद कुमार यांनी कोरोनाची बाधा झालेल्या पेशींच्या रचनेचा अभ्यास करण्यात येत असल्याचे सांगितले.
हेही वाचा-केंद्र सरकारची परवानगी नसतानाही विमान कंपन्यांचे १ जूनपासून ऑनलाईन बुकिंग सुरू
येत्या काही महिन्यात मोठ्या समुहाचे स्क्रिनिंग करण्यासाठी असलेले सीएमओएस डिटेक्टर काही महिन्यातं बाजारात येईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीत (युएई) सुमारे २५ हजार ६३ कोरोनाबाधित आढळले आहेत. तर २२७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
हेही वाचा-फेसबुकसह इन्स्टाग्रामवर ऑनलाईन शॉप सुरू करण्याची मिळणार सुविधा