ETV Bharat / business

बेरोजगारीचे संकट ; तीन महिन्यात शोरुममध्ये काम करणाऱ्यांनी गमविल्या २ लाख नोकऱ्या - डीलरशिप

एफएडीएचे अध्यक्ष आशिष हर्षराज काळे यांनी बहुतांश नोकऱ्यांमधील गेल्या तीन महिन्यात कपात झाल्याचे सांगितले. ही स्थिती जून आणि जुलैमध्ये सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

रोजगार
author img

By

Published : Aug 4, 2019, 4:11 PM IST

नवी दिल्ली - गेल्या तीन महिन्यात ऑटोमोबाईल डीलरशिपमध्ये काम करणाऱ्या दोन लाखांहून अधिक जणांनी नोकऱ्या गमाविल्या आहेत. कधी नव्हे तेवढ्या प्रमाणात वाहनांची विक्री कमी झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून वाहनांची किरकोळ विक्री करणारे व्यायवसायिक मनुष्यबळात कपात करत आहेत.

वाहन उद्योगात तत्काळ सुधारणा होणार नसल्याचे फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने (एफएडीए) म्हटले आहे. शोरुममधील नोकऱ्यांत अजून कपात होईल, अशी भीतीही एफएडीएने व्यक्त केली. जीएसटी कपातीसह इतर निर्णय घेवून सरकारने हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा एफएडीएने व्यक्त केली.

बहुतांश नोकऱ्यांमधील कपात गेल्या तीन महिन्यात झाल्याचे एफएडीएचे अध्यक्ष आशिष हर्षराज काळे यांनी सांगितले. ही स्थिती जून आणि जुलैमध्ये सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. बहुतांश कमी झालेल्या नोकऱ्या या विक्री विभागामधील आहेत. मात्र हीच परिस्थिती सुरू राहिली तर तांत्रिक विभागामधील नोकऱ्यांवर परिणाम होईल, अशी त्यांनी भीती व्यक्त केली. जर विक्री कमी तर सेवा ही कमी हे चक्र सुरू राहणार आहे.

देशातील १५ हजार डीलरकडून वाहनांच्या २६ हजार शोरुम चालविली जातात. त्यामध्ये थेट २.५ दशलक्ष लोकांना नोकऱ्या दिल्या जातात. डीलरशिप असलेले २८६ शोरुम केवळ १८ महिन्यात एप्रिलपर्यंत बंद झाले आहेत. मान्सूनमध्ये सुधारणा, एनबीएफसीमधील कर्जपुरवठ्याची समस्या सुटल्यास वाहन उद्योगात सुधारणा होईल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.

Intro:Body:

DUmmy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.