चेन्नई - दुचाकी आणि तीन चाकी वाहन निर्माता कंपनी टीव्हीएस मोटर कंपनीने सोमवारी सांगितले की, गेल्या महिन्यात 3 लाख 94 हजार 724 वाहनांची विक्री झाली आहे. मागील वर्षातील ऑक्टोबरच्या तुलनेत ती 22 टक्क्यांनी वाढली आहे.
ऑक्टोबर 2020 मध्ये 3 लाख 94 हजार 724 युनिट्स (3 लाख 82 हजार 121 दुचाकी आणि 12 हजार 603 तीन चाकी) विकल्या गेल्या आहेत. ऑक्टोबर 2019 मध्ये कंपनीने 3 लाख 23 हजार 368 युनिट्स (3 लाख 8 हजार 161 दुचाकी 15 हजार 207 तीन चाकी) वाहनांची विक्री झाली होती. यंदाच्या विक्रीमध्ये 22 टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे कंपनीने निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा - वाहनांच्या विक्रीत ऑक्टोबरमध्ये वाढ,पण...
ऑक्टोबर 2020 मध्ये कंपनीच्या एकूण निर्यातीत 33 टक्क्यांनी वाढ झाली. यंदा कंपनीने 92 हजार 520 वाहनांची निर्यात केली.
ऑक्टोबर 2020 मध्ये दुचाकी वाहनांच्या निर्यातीत तब्बल 46 टक्क्यांनी (80 हजार 741 वाहने) वाढ झाली आहे. ऑक्टोबर 2020 मध्ये हा आकडा 55 हजार 477 युनिट एवढा होता.
हेही वाचा - ताशी २५० किलोमीटर वेगाने धावणाऱ्या बीएमडब्ल्यूृचे मॉडेल भारतात लाँच