ETV Bharat / business

चीनमधून भारतात येणाऱ्या अॅपलला डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दिला इशारा - डोनाल्ड ट्रम्प इशारा

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत चीनमधून बाहेर पडणाऱ्या अमेरिकन कंपन्यांबाबत मत व्यक्त केले. ते म्हणाले, की चीनमधून अमेरिकन कंपन्यांनी अमेरिकेत परतण्यासाठी करात सवलत देण्यात आलेली आहे. अॅपलने १०० टक्के उत्पादने अमेरिकेत तयारी करावीत, असे ट्रम्प यांनी म्हटले.

डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्प
author img

By

Published : May 15, 2020, 2:53 PM IST

वॉशिंग्टन - अॅपल कंपनी चीनमधून भारतात उत्पादन प्रकल्प हलविण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलला अतिरिक्त कर लावण्याचा इशारा दिला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत चीनमधून बाहेर पडणाऱ्या अमेरिकन कंपन्यांबाबत मत व्यक्त केले. ते म्हणाले, की चीनमधून अमेरिकन कंपन्यांनी अमेरिकेत परतण्यासाठी करात सवलत देण्यात आलेली आहे. अॅपलने १०० टक्के उत्पादने अमेरिकेत तयारी करावीत, असे ट्रम्प यांनी म्हटले. त्या मार्गाने काम होवू शकते. अॅपलसाठी आम्ही फार काही करू शकत नाही. त्यांनी आमच्यासाठी (मदत) करावी, असे ट्रम्प म्हणाले.

हेही वाचा-कोरोनाच्या संकटात टीकेचे धनी झालेल्या डब्ल्यूटीओच्या प्रमुखांचा राजीनामा

ट्रम्प यांनी चीनबरोबर व्यापार युद्ध सुरू असताना सातत्याने ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवरील शुल्क वाढविण्याचा इशारा सातत्याने दिला होता. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कोरोना संकटाचे रुपांतर संधीत करत विदेशा कंपन्यांना गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्याची योजना जाहीर केली आहे. कोरोनाच्या संकटानंतर चीनमध्ये असलेल्या वुहानमधील पुरवठा साखळी विस्कळित झाली आहे.

हेही वाचा-कर्ज कोण देणार आहे? चिदंबरम यांची पॅकेजवरून सरकारवर उपहासात्मक टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.