ETV Bharat / business

जुलै ते सप्टेंबर 2020 अखेरच्या तिमाहीचा ट्रायचा 'इंडियन टेलिकॉम सर्व्हिसेस परफॉरमन्स इंडिकेटर रिपोर्ट'

author img

By

Published : Jan 29, 2021, 7:18 PM IST

भारतीय दूरसंचार विभाग, दूरसंचार विभागाअंतर्गत वैधानिक प्राधिकरण भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) आज 30 सप्टेंबर 2020 रोजी संपलेल्या तिमाहीचा 'इंडियन टेलिकॉम सर्व्हिसेस परफॉरमन्स इंडिकेटर रिपोर्ट' जाहीर केला आहे.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण लेटेस्ट न्यूज

नवी दिल्ली - भारतीय दूरसंचार विभाग, दूरसंचार विभागाअंतर्गत वैधानिक प्राधिकरण भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) आज 30 सप्टेंबर 2020 रोजी संपलेल्या तिमाहीचा 'इंडियन टेलिकॉम सर्व्हिसेस परफॉरमन्स इंडिकेटर रिपोर्ट' जाहीर केला आहे.

भारतातील टेलिफोन ग्राहकांची संख्या जून-2020 च्या अखेरीस 1,160.52 दशलक्षांवरून वाढून सप्टेंबर -2020, अखेर 1,168.66 दशलक्ष झाली आहे, मागील तिमाहीच्या तुलनेत 0.70% वाढीची नोंद झाली आहे. हे मागील वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत (इयर-ऑन-इयर - वाय-ओ-वाय) घसरण दर प्रतिबिंबित करते. भारतातील एकूणच टेली-डेन्सिटी देखील क्यूई जून -2020 मधील 85.85% वरून वाढून ती क्यूई सप्टेंबर -2020 मध्ये 86.22% पर्यंत पोहोचली आहे.

हेही वाचा - जागतिक आर्थिक मंचचा जागतिक जोखीम अहवाल 2021

टेलिफोन ग्राहकांमधील कल (ट्रेंड) आणि भारतातील टेलिफोन ग्राहकांची घनता

  • जून -2020 च्या अखेरीस 636.83 दशलक्ष असलेली शहरी भागातील टेलिफोन ग्राहकांची संख्या सप्टेंबर 2020 पर्यंत वाढून 644.26 दशलक्षांपर्यंत पोहोचली. तसेच, याच कालावधीत शहरी भागातील टेलिफोन ग्राहकांची घनताही वाढून 137.35% वरून 138.25% वर पोहोचली.
  • ग्रामीण टेलिफोन ग्राहक जून-2020 च्या अखेरीस 523.69 दशलक्ष होते. ते वाढून सप्टेंबर - 2020 च्या अखेरीस 524.39 दशलक्षांवर पोहोचले. तथापि, ग्रामीण दूरध्वनी घटना समानच राहिली. म्हणजेच, ही घनता 58.96% इतकीच राहिली, जेवढी मागील तिमाहीत जून 2020 मध्ये होती.
  • एकूण ग्राहक-जोडणींपैकी, ग्रामीण जोडणींचा हिस्सा जून - 2020 अखेर 45.13% वरून सप्टेंबर - 2020 अखेर 44.87% पर्यंत कमी झाला.
  • या तिमाहीत 7.88 दशलक्ष ग्राहकांच्या निव्वळ वाढीसह, वायरलेस ग्राहकांची संख्या जून - 2020 अखेर 1,140.71 दशलक्षावरून सप्टेंबर - 2020 अखेर 1,148.58 दशलक्ष झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 0.69% एवढा वाढीचा दर नोंदविला आहे. तिमाहीत. तथापि, वाय-ओ-वाय तत्त्वावर वायरलेस सदस्यता वर्षामध्ये 2.14% दराने कमी झाली.
  • सप्टेंबर-2020 अखेर इंटरनेटच्या एकूण ग्राहकांची संख्या 776.45 झाली. ती जून-2020 मध्ये 749.07 दशलक्ष होती. याचा तिमाही विकास दर 3.66% आहे. 776.45 दशलक्ष इंटरनेट ग्राहकांपैकी वायर्ड इंटरनेट ग्राहकांची संख्या 24.36 दशलक्ष आहे आणि वायरलेस इंटरनेट ग्राहकांची संख्या 752.09 दशलक्ष आहे.

हेही वाचा - सर्वसामान्य जनतेचा अर्थसंकल्पामध्ये विचार व्हावा; शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांची मागणी

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.