नवी दिल्ली - टिंडर या डेटिंग अॅपवरील छळवणुकीचे प्रकार कमी होण्याकरिता कंपनीने बदल केला आहे. यापुढे आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यापूर्वी तुम्हाला खात्री आहे का, (आर यू शुअर) असा प्रश्न किंडर वापरकर्त्याला विचारणार आहे.
टिंडर डेटिंग अॅपवर आर यू शुअर (एवायएस) हे फीचर सुरू झाले आहे. या फीचरमुळे टेस्टिंगमध्ये आक्षेपार्ह मजकुरामध्ये १० टक्के कमी प्रमाण झाले आहे. कृत्रिम मानवी बुद्धिमत्ते वापर करून वापरकर्त्यांना आक्षेपार्ह मजकूर असेल तर इशारा देणारे संदेश पाठविले जाणार आहेत. यापूर्वी ज्या पद्धतीच्या मजकुराला रिपोर्ट करण्यात आले आहे, असे मजकूर पोस्ट होत असताना वापरकर्त्याला इशारा मिळणार आहे. त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा होणार असल्याचे टिंडर कंपनीने म्हटले आहे.
हेही वाचा-महिंद्रा अँड महिंद्राकडून सर्व वाहनांवरील वॉरंटीला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ
अॅडव्हायझरी काउन्सिलबरोबर टिंडरचे ग्रुप-
एवायएस फीचरचे योग्य परिणाम दिसत असल्याचे मॅच ग्रुपच्या प्रमुख ट्रेसि ब्रीडेन यांनी म्हटले आहे. टिंडरकडून सुरक्षित आणि योग्य व्यक्तींना संदेश पाठविण्यासाठी बांधील असल्याचे कंपनीने म्हटले आहे. गेल्या काही वर्षांपासून टिंडर हे मॅच ग्रुप अॅडव्हायझरी काउन्सिलबरोबर सुरक्षिततेसाठी काम करत आहे.
हेही वाचा-हिरो मोटोकॉर्प २४ मेपासून सर्व उत्पादन प्रकल्प पुन्हा करणार सुरू