लंडन - १७८ वर्षांपासून पर्यटन सेवा देणारी थॉमस कुक ग्रुप कंपनी बुडित निघाली आहे. कंपनीने कर्जदारांचे पैसे थकित ठेवल्याने हजारो प्रवासी विदेशात अडकले आहेत. असे असले तरी भारतीय कंपनीच्या व्यवसायावर काहीही परिणाम झाला नसल्याचा दावा करण्यात येत आहे.
थॉमस कुक ग्रुप कंपनीच्या संचालक मंडळाने सर्व मालमत्ता त्वरित विक्रीला काढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, देशातील थॉमस कुक इंडिया लि. (टीसीआयएल) ही ऑगस्ट २०१२ पासून मूळ कंपनीहून पूर्णपणे वेगळी झालेली आहे. टीसीआयएलचा ताबा कॅनडाची बहुराष्ट्रीय कंपनी फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्जकडे आहे. ही थॉमस कुक युकेचा टीसीआयएलमध्ये कोणताही हिस्सा नसल्याचे कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक माधवन मेनन यांनी सांगितले. गेली सात वर्षे फायदेशीर ठरली आहे. आम्ही वेगाने प्रगती करत आहोत. तसेच वारसा म्हणून स्वतंत्र संस्था तयार करत आहोत.
टीसीआयलकडून विदेशी चलन बदलून देणे, कॉर्पोरेटच्या बैठकी, प्रदर्शन, परिषदा घेणे, विमा, व्हिसा, पासपोर्ट आणि ई-बिझनेस या सेवा देण्यात येतात.
हेही वाचा-आठवडाभरात पेट्रोल १.६० रुपयाने महागले! सलग सातव्या दिवशी दरवाढ सुरूच
थॉमस कुक ग्रुप ही कंपनी बुडल्याने विदेशात हजारो ग्राहक अडकले आहेत. त्यांना आणण्यासाठी ब्रिटिश सरकारने भाड्याने चार्टर घेतले आहेत. शेवटच्या क्षणी पैसे उभा करण्याचा कंपनीचा प्रयत्न सोमवारी विफल ठरला. नव्या बुकिंग, विमान बुकिंग व सहलींच्या बुकिंग रद्द करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा-शेअर बाजारातील तेजीने गुंतवणूकदार 'मालामाल '; दोन दिवसात 10.50 लाख कोटींची संपत्ती भर
शांतताकाळात विदेशातून इंग्लंडचे नागरिक मायदेशात परत आणण्याचा हा इतिहासातील सर्वात मोठा कार्यक्रम ठरल्याचे इंग्लंड सरकारने म्हटले आहे. येत्या दोन आठवड्यात सर्व इंग्लंडच्या प्रवाशांना मोफत मायदेशी आणण्यात येणार असल्याचे इंग्लंड सरकारने म्हटले आहे. थॉमस कुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर फँखाउसेर यांनी ग्राहक, कर्मचारी, पुरवठादार आणि भागीदारांची माफी मागितली आहे. ही कंपनी ब्रिटनची उत्कृष्ट नाममुद्रा (ब्रँड) म्हणून जगभरात ओळखली जात होती.
हेही वाचा-पहिल्यांदाच आयआरसीटीमार्फत चालणाऱ्या तेजस एक्सप्रेसची दोन दिवसात बुकिंग फुल
थॉमस कुकला २०० दशलक्ष पौंड उभा करणे शक्य झाले नसल्याने कंपनीला कामकाज बंद करावे लागले.
या कारणाने संकट निर्माण झाल्याचा ग्रुपने केला दावा
- तुर्कीसारख्या पर्यटनस्थळातील राजकीय अस्थिरता
- गेल्या ऋतूमध्ये दीर्घकाळ चाललेली उष्णतेची लाट
- ब्रेक्झिटनंतर ग्राहकांनी ढकललेली सहल नोंदणी