मुंबई - कोरोनाच्या काळात रोजगाराकरिता दिलासादायक बातमी आहे. सॉफ्टवेअर निर्यातीत आघाडीची कंपनी असलेल्या टीसीएसने चालू आर्थिक वर्षात कॅम्पसमधून ४० हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्याचे जाहीर केले आहे.
टीसीएस ही खासगी क्षेत्रात कर्मचारी असलेली सर्वात मोठी कंपनी आहे. टीसीएसचे देशभरात ५ लाख कर्मचारी आहेत. मागील वर्षात कंपनीने ४० हजार पदवीधरांना कॅम्पसमधून नोकऱ्या दिल्या आहेत. यंदा आणखी विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार असल्याचे टीसीएसचे जागतिक मानवी संसाधन प्रमुख मिलींद लक्कड यांनी सांगितले.
हेही वाचा-सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे दर
गेल्या वर्षी ३.६० लाख विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश परीक्षा दिली
कोरोना महामारीमुळे निर्बंध असताना नोकरी भरतीमध्ये कोणताही अडथळा आला नव्हता. गतवर्षी ३.६० लाख फ्रेशर विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश परीक्षा दिली होती. या वर्षी ४० हजार किंवा त्याहून अधिक विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्या जाणार असल्याचे टीसीएसचे जागतिक मानवी संसाधन प्रमुख लक्कड यांनी सांगितले.
हेही वाचा-NEW PRIVACY POLICY अंमलबजावणीकरता व्हॉट्सअपचे पुन्हा एक पाऊल मागे
भारतात बुद्धिमत्तेच्या पुरवठ्याची कमतरता नाही!
गतवर्षी कंपनीने अमेरिकन कॅम्पसमधून २ हजार प्रशिक्षणार्थी घेतले होते. यंदा त्याहून अधिक प्रशिक्षार्थींना नोकऱ्या दिल्या जाणार आहेत. कॅम्पसमधून विद्यार्थ्यांना नोकऱ्या देण्यासाठी खूप नियोजन केले जात आहे. त्यासाठी तीन महिने किंवा त्याहून कमी वेळ लागणार आहे. एन. गणपथी सुब्रमण्यम म्हणाले, की भारतात बुद्धिमत्तेच्या पुरवठ्याची कमतरता नाही. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन म्हणाले, की अनेकदा संस्था ही खूप मोठी असल्याचे म्हटले जाते. मात्र संरचनेमुळे व्यवस्थापन शक्य होते.
टीसीएसने सहा महिन्यात कर्मचाऱ्यांना दोनदा दिली होती वेतनवाढ-
दरम्यान, कोरोनाच्या काळात वेतनवाढीची प्रतिक्षा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना टीसीएसने खूश केले होते. टाटा कन्सलन्टसी सर्व्हिसेसने (टीसीएस) वर्ष २०२१-२२ साठी कर्मचाऱ्यांकरता वेतनवाढ जाहीर केली होती. या वेतनवाढीचा कंपनीमधील सुमारे ४.७ लाख कर्मचाऱ्यांना फायदा झाला आहे. टीसीएसने मार्च २०२१ मध्ये कर्मचाऱ्यांना नियमाप्रमाणे साधारणत: ६ ते ७ टक्के वेतनवाढ केल्याचे सूत्राने सांगितले.सहा महिन्यात कंपनीने दुसऱ्यांदा वेतनवाढ दिली आहे.
हेही वाचा-उत्तर प्रदेशात कोरोनाच्या कप्पा व्हेरियंटने रुग्णाचा मृत्यू