ETV Bharat / business

टाटा सफारीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद; एकाच दिवसात दिल्लीत १०० वाहनांची विक्री - टाटा मोटर्स सफारी विक्री न्यूज

टाटा मोटर्स पॅसेंजर उद्योगाचे प्रादेशिक क्षेत्र व्यवस्थापक (उत्तर) रितेश खरे म्हणाले की, नव्या सर्व सफारीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आम्ही आनंदित आहोत. एकाच दिवसात १०० सफारींची डिलिव्हरी होणे हा चांगल्या प्रतिसादाचा पुरावा आहे.

Tata Safari
टाटा सफारी
author img

By

Published : Mar 2, 2021, 7:53 PM IST

नवी दिल्ली -टाटा मोटर्सने नव्याने लाँच केलेल्या सफारीला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. टाटा मोटर्सने आज एकाच दिवसात १०० सफारी या दिल्ली आणि एनसीआर भागात ग्राहकांना दिल्या आहेत. बहुतेक ग्राहकांनी एक्सझेडए प्लस ट्रीम सफारीची निवड केल्याचे कंपनीने म्हटले आहे.

टाटा मोटर्स पॅसेंजर उद्योगाचे प्रादेशिक क्षेत्र व्यवस्थापक (उत्तर) रितेश खरे म्हणाले की, नव्या सर्व सफारीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आम्ही आनंदित आहोत. एकाच दिवसात १०० सफारींची डिलिव्हरी होणे हा चांगल्या प्रतिसादाचा पुरावा आहे. कंपनीने एसयूव्हीचे स्वागतमूल्य १४.६९ लाख ते २१.४५ लाख रुपये ठेवले आहे.

हेही वाचा-'नोटाबंदीच्या चुकीच्या निर्णयाने देशात बेरोजगारीचे वाढते प्रमाण'

नवीन सफारी ही लँड रोव्हरमधील डी८ प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. त्यामुळे भविष्यातील इलेक्ट्रिफिकेशन करणे शक्य आहे. कंपनीचे हॅरियर एसयूव्ही हे देखील डी८ प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. नवीन सफारीमध्ये सहा आणि सात आसने आहेत. तर २ लिटर डिझेल इंजिन आणि १७० पीएस उर्जेची क्षमता आहे.

हे आहेत टाटा सफारीचे नवीन वैशिष्ट्ये

  • एसयूव्ही श्रेणी ही देशातील प्रवासी वाहनांच्या व्यवसायात वेगाने वाढत आहे.
  • नवीन सफारीमध्ये २ लिटर टर्बोचार्ज क्रिटोक इंजिन आहे. तर २,७४१ एमएम व्हीलबेस आहे.
  • विशेष म्हणजे सफारीची अंतर्गत रचना ही लँड रोव्हरच्या डी ८ प्लॅटफॉर्ममधून घेण्यात आली आहे. न
  • वीन एसयूव्हीचे वाहन हे नऊ श्रेणीमध्ये उपलब्ध होणार आहे. ही श्रेणी एक्स ई ते एक्स झेड ए प्लस अशा श्रेणीमध्ये असणार आहे.
  • ओयस्टर व्हाईट इंटिरिअर व अ‌ॅशवूड फिनिश डॅशबोर्डचे छत आहे. सहा ते सात आसनी असलेल्या सफारीमध्ये ८.८ इंचची इसलँड इनफोटेन्मेंट व्यवस्था आहे.

हेही वाचा-जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी यांचा आठवा क्रमांक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.