नवी दिल्ली - कोरोना महामारीमुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीची उड्डाणांवरील निर्बंध डीजीसीएने पुन्हा वाढविले आहेत. या निर्बंधामुळे ३० जुनपर्यंत आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीची उड्डाणे पूर्वीप्रमाणे बंद राहणार आहेत.
आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर निर्बंध असले तरी नियोजीत यंत्रणेने परवानगी दिलेल्या विमान उड्डाणांना परवानगी असल्याचे नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) म्हटले आहे. कोरोना महामारीमुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर २३ मे २०२० पासून निर्बंध आहेत. मात्र, वंदे भारत मोहिमेच्या विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणांना मे २०२० पासून परवानगी आहे.
हेही वाचा-जीएसटी परिषदेची बैठक सुरू; कोरोना उपचारातील औषधांना जीएसटीत सवलत मिळणार?
निवडक देशांबरोबर एअर बबल्सची व्यवस्था
भारताने जुलै २०२० पासून निवडक देशांबरोबर एअर बबल्सची व्यवस्था केली आहे. भारताने अमेरिका, दुबई, केनिया, भुतान आणि फ्रान्ससह २७ देशांबरोबर एअर बबल्सची व्यवस्था केली आहे. एअर बबल्समध्ये दोन्ही देशांना आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीची परवानगी असते.
हेही वाचा-कोरोना महामारीने मोठ्या प्रमाणात स्टार्टअपसह एसएमई पडले बंद -सर्वेक्षण
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर निर्बंध-
डीजीसीएच्या निर्देशानुसार आंतरराष्ट्रीय विमान मालवाहतुकीवर निर्बंध लागू होणार नाहीत. तसेच वेळोवेळी परवानगी दिलेल्या विमान वाहतुकीलाही निर्बंध लागू होणार नाहीत. भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधून जात आहे. मागील काही दिवसांत नवीन कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत आहे. अशा परिस्थितीतही भारताने आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवरील निर्बंध वाढविले आहेत.