नवी दिल्ली - केंद्र सरकारने टाळेबंदी जाहीर केल्यानंतर रेल्वेने सर्व मार्गावरील रेल्वे बंद केल्या आहेत. या कालावधीत रेल्वे मार्गांचा वापर स्पेशल पार्सल रेल्वे म्हणून करण्यात आला आहे. यामधून रेल्वेला २१ दिवसांमध्ये ७.५४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.
रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार ई-कॉर्मस कंपन्या, राज्य सरकार आणि इतर ग्राहकांसाठी स्पेशल पार्सल रेल्वे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या ६५ मार्गांवरील रेल्वेमधून मोठ्या प्रमाणात मालाची वाहतूक करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळित होण्यासाठी रेल्वेने वेळापत्रक तायर केले होते. अधिकाऱ्याच्या माहितीनुसार १४ एप्रिलपर्यंत एकूण ५२२ स्पेशल पार्सल रेल्वे सुरू होत्या. या रेल्वेमधून १ हजार ८३५ टन मालाची वाहतूक करण्यात आली.
हेही वाचा-कोरोनाशी लढा : पी अँड जी करणार साडेदहा लाख मास्कचे वाटप
भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी देण्यात येणाऱ्या सर्व रेल्वे २४ मार्च ते १४ एप्रिलपर्यंत बंद केल्या होत्या. १४ एप्रिलला संपणारी टाळाबंदी ३ मेपर्यंत वाढविल्यानंतर रेल्वेने पुन्हा एकदा सर्व रेल्वे व आरक्षण सेवा रद्द केली आहे.
हेही वाचा-'या' कंपनीकडून तामिळनाडू सरकारला १० हजार 'पीपीई'ची मदत