नवी दिल्ली - देशात १८ मे रोजीपासून सुरू झालेल्या चौथ्या टाळेबंदीत विमान प्रवासावर निर्बंध घातले आहेत. असे असले तरी कोरोनाच्या संकटाची झळ बसलेल्या विमान कंपन्यांनी १ जूनपासून ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरू केले आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या टाळेबंदीत परवानगी नसतानाही विमान कंपन्यांनी बुकिंग सुरू केले होते.
टाळेबंदी ४.० मध्ये उद्योग, बाजारपेठ आणि कारखाने सुरू करण्यासाठी शिथिलता देण्यात आले आहे. मात्र, ३१ मार्चपर्यंत देशातील व आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे.
इजमायट्रीपचे सीईओ निशांत पिट्टी यांनी सांगितले, की काही आर्थिक संकटात सापडलेल्या विमान कंपन्यांनी बुकिंग सेवा जूनपासून सुरू केली आहे. त्यामुळे त्यांना कठीण अशा काळात काही काळ तग धरून राहणे शक्य होणार आहे.
हेही वाचा-खासगी कंपन्यांतील कर्मचाऱ्यांची वाढणार चिंता; गृह मंत्रालयाने 'तो' आदेश घेतला मागे
केंद्र सरकारने आणि नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) विमान प्रवासाचे बुकिंग सुरू करण्यासाठी कोणतीही सूचना दिलेली नाही.
हेही वाचा-नाबार्डकडून सहकारी बँकांसह प्रादेशिक ग्रामीण बँकांना २०,५०० कोटींचे वाटप