नवी दिल्ली - ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या कोरोनावरील लसीला इंग्लंड सरकारने मान्यता दिल्याचे सीरम इन्स्टि्यूटने स्वागत केले आहे. ही सकारात्मक बातमी असल्याचे प्रतिक्रिया सीरमने दिली आहे.
इंग्लंड सरकारने फायझर पाठोपाठ ऑक्सफोर्डच्या अॅस्ट्राझेनेका या लसीला मंजुरी दिली आहे. यावर ऑक्सफोर्ड विद्यापीठाबरोबर लसीसाठी करार करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने प्रतिक्रिया दिली आहे. कंपनीने म्हटले की, इंग्लंडकडून ऑक्सफोर्डच्या लसीला मंजुरी मिळणे ही खूप चांगली प्रोत्साहनात्मक बातमी आहे. आम्ही भारतीय नियामक संस्थांकडून अंतिम मंजुरी मिळण्यासाठी वाट पाहत आहोत.
हेही वाचा-सोन्याच्या दरात अंशत: घसरण; चांदी महाग
ऑक्सफोर्ड लसीचे देशात ५ कोटी डोस तयार-
सीरमने कोरोना लसीसाठी भारतीय औषधी नियंत्रक महासंचालनालयाकडे अर्ज केला आहे. कंपनीने कोरोना लसीचे पाच कोटी डोस तयार केले आहेत. तर येत्या मार्चपर्यंत लसीचे १० कोटी डोस तयार करण्याचे कंपनीने उद्दिष्ट निश्चित केले आहे.
दरम्यान, भारत बायोटेसह फायझर या कंपन्यांनीही कोरोना लसीसाठी डीसीजीआयकडे अर्ज केला आहे.
हेही वाचा-आंतरराष्ट्रीय विमान सेवेच्या स्थगतीत ३१ जानेवारी २०२१ पर्यंत वाढ