नवी दिल्ली - इंटरनेटवरील माहिती गोपनीय व सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. सायबर गुन्हेगारांनी 2.9 कोटी भारतीयांची वैयक्तिक माहिती डार्क वेबवरील हॅकिंग फोरममध्ये लीक केली आहे. विशेष म्हणजे ही माहिती डार्क वेबवर मोफतपणे उपलब्ध करण्यात आली आहे.
भारतीयांचा वैयक्तिक डाटा लीक झाल्याचे प्रकरण सीबल या खासगी ऑनलाईन गुप्तचर संस्थेने शोधून काढले आहे. यापूर्वी सीबलने फेसबुक आणि अनअॅकडेमधील हॅकिंग प्रकरण उघडकीस आणले होते.
हेही वाचा-अनिल अंबानींना इंग्लंडच्या न्यायालयाचा दणका; 71.7 कोटी डॉलर बँकेला देण्याचे आदेश
नोकरीच्या शोधात असलेल्या 2.9 कोटी दशलक्ष भारतीयांची वैयक्तिक माहिती डीप वेबवर आहे. हे अनेकदा दिसून येते. मात्र, यावेळी अनेकांचे पत्ते, शिक्षण व संपर्क क्रमाक देण्यात आली आहे. ही माहिती जॉब पोर्टलमधून घेण्यात आल्याची शक्यता सीबलने व्यक्त केली आहे. सायबर गुन्हेगार ऑनलाईन फसवणूक, घोटाळे अशा बेकायदेशीर कृत्यांसाठी अशा माहितीचा उपयोग करतात, असे सायबने म्हटले आहे.
हेही वाचा-कोरोनाशी 'भारतीय पोस्ट'चा लढा; २ हजार टन औषधांसह साधनांची डिलिव्हरी
काय आहे डार्क वेब?
डार्क वेब हा नेहमीच्या संकेतस्थळामधून दिसू शकणारे ऑनलाईन माध्यम आहे. यामध्ये अनेक बेकायदेशीर आणि गुन्हेगारीचे कृत्य चालतात. डार्क वेबसाठी स्वतंत्र ब्राऊझर असते.