ETV Bharat / business

ऑक्सफोर्ड विद्यापीठनिर्मित कोरोना लसीचे पुण्यात सुरू होणार उत्पादन

लसीच्या उत्पादनासाठी सिरमने ऑक्सफोर्ड विद्यापीठाबरोबर भागीदारी केली आहे. जगभरातील केवळ सात इन्स्टिट्यूट ऑक्सफोर्डने लसीच्या उत्पादनाची परवानगी दिली आहे.

author img

By

Published : Apr 26, 2020, 3:31 PM IST

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात निर्णायक विजय ठरू शकणारी बातमी आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या कोरोनाच्या लसीचे उत्पादन पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट घेणार आहे. हे उत्पादन तीन आठवड्यात सुरू होणार आहे. तर मानवी चाचणी यशस्वी झाली तर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कोरोनाची लस बाजारात उपलब्ध होणार आहे.

लसीच्या उत्पादनासाठी सिरमने ऑक्सफोर्ड विद्यापीठाबरोबर भागीदारी केली आहे. जगभरातील केवळ सात इन्स्टिट्यूट ऑक्सफोर्डने लसीच्या उत्पादनाची परवानगी दिली आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला म्हणाले, की ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या डॉ. हिल यांच्यासमवेत आमची टीम जवळून काम करत आहे. पहिल्या सहा महिन्यात दर महिन्याला ५० लाख लसीचे उत्पादन घेण्यात येणार आहे. हे प्रमाण वाढून दर महिन्याला १ कोटी लसीचे उत्पादन घेण्याची क्षमता होईल, असा विश्वास आहे.

हेही वाचा-गरिबांना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून डाळींचे होणार वाटप

पुढे ते म्हणाले, की यापूर्वी सिरमने मलेरियाच्या लसीसाठी ऑक्सफोर्ड विद्यापीठाबरोबर भागीदारी केली आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञ हे जगातील सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञापैकी आहेत, हे खात्रीने सांगू शकतो. येत्या दोन ते तीन आठवड्यात भारतात चाचणी सुरू करण्यात येणार आहे. जर मानवी चाचणी यशस्वी झाली तर सप्टेंबर-ऑक्टोबरदरम्यान बाजारात लस उपलब्ध होणार आहे. आम्ही स्वत: जोखीम घेत सुरुवातीला उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा-सुंदर पिचाई यांना वेतनांसह मिळणारे भत्ते जगात सर्वाधिक; आकडा ऐकून व्हाल थक्क

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.