ETV Bharat / business

शेअर बाजार निर्देशांक ३०० अंशांनी वधारला; महागाईच्या आकडेवारीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष - Bombay Stock Exchange

मुंबई शेअर बाजार निर्देशांक ३३१.०४ अंशांनी वधारून ४१,५४७.१८ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ९३.५० अंशांनी वधारून १२,२०१.४० वर पोहोचला.

Bombay Stock Exchange
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज
author img

By

Published : Feb 12, 2020, 12:09 PM IST

मुंबई - शेअर बाजार खुला होताना निर्देशांक ३०० अंशांनी वधारला आहे. एचडीएफसी ट्विन्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक आणि हिंदुस्थान युनिलिव्हरचे शेअर वधारले आहेत. महागाईची आकडेवारी आणि कारखान्यातील उत्पादनांची आकडेवारी जाहीर होणार आहे.

मुंबई शेअर बाजार निर्देशांक ३३१.०४ अंशांनी वधारून ४१,५४७.१८ वर पोहोचला. तर निफ्टीचा निर्देशांक ९३.५० अंशांनी वधारून १२,२०१.४० वर पोहोचला.

विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी मंगळवारी २०९.३९ कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. तर देशातील गुंतवणूकदार संस्थांनी ३४४.६३ कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली.

हेही वाचा- केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून महागाईच्या आकडेवारीकडे कानाडोळा; विकासदर धोक्यात

तिसऱ्या तिमाहीतील कंपन्यांनी केलेल्या वित्तीय कामगिरीकडे देशातील गुंतवणूकदारांचे लक्ष असल्याचे देशातील विश्लेषकांनी सांगितले. तर जानेवारीतल कारखान्यांचे उत्पादन आणि ग्राहक किंमत निर्देशांकाची आकडेवारी जाहीर होणार आहे. या आकडेवारीकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष लागल्याचे विश्लेषकांनी सांगितले.

हेही वाचा- 'जीएसटी' परतावा मुदतवाढीच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.