मुंबई - तुम्ही स्टेट बँकेचे ग्राहक असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाची इंटरनेट बँकिंग, योनो आणि युपीआय सेवा रविवारी 4 जुलै) दोन तास बंद राहणार आहे.
स्टेट बँकेने ट्विट करत इंटरनेट सेवेबाबतचे अपडेट दिले आहेत. बँकेने ट्विटमध्ये म्हटले, की 4 जुलै 2021 ला आम्ही दुपारी 3 वाजून 25 मिनिटे ते सायंकाळी 5 वाजून 50 मिनिटापर्यंत देखभाल व दुरुस्तीचे काम करणार आहोत. यावेळी योनोची इंटरनेट बँकिंग, योनो, योनो लाईट आणि युपीआय उपलब्ध राहणार नाही. यावेळी आमच्या प्रतिष्ठित ग्राहकांनी आमच्यासोबत राहावे.
यापूर्वीही स्टेट बँकेने 17 जून आणि 1 एप्रिल 2021 देखभाल आणि दुरुस्तीचे काम केले होते.
हेही वाचा-चारित्र्याच्या संशयावरून नवऱ्याने बायकोला कुत्र्यासारखे साखळीने बांधले
योनोचे सुमारे 2.6 कोटी नोंदणीकृत वापरकर्ते
स्टेट बँकेच्या माहितीनुसार योनोचे सुमारे 2.6 कोटी नोंदणीकृत वापरकर्ते आहेत. दररोज 55 लाख लॉग इन आणि 4 हजार वैयक्तिक कर्जाचे वाटप करण्यात येते. तर 16 हजार योनो कृषी अॅग्री गोल्ड लोनचे वाटप करण्यात आले आहे. स्टेट बँकेच्या एकूण व्यवहारांमध्ये मोबाईल बँकिंगचा सुमारे 55 टक्के हिस्सा होता.
हेही वाचा-राफेल सौदा संशयाच्या भोवऱ्यात; फ्रान्समधील न्यायालय करणार चौकशी
स्टेट बँकेला 215 वर्षे पूर्ण-
- 1 जुलै 2021 रोजी स्टेट बँकेला 215 वर्ष पूर्ण झाली आहेत. ही बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियापेक्षा जुनी आहे. रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935 साली झाली होती. तर त्याच्याही 130 वर्षांपूर्वी बँक ऑफ कलकत्ता अस्तित्त्वात आली होती. जी आज जगात भारतीय स्टेट बँक म्हणून ओळखली जाते.
- 31 मार्च 2020 रोजी संपलेल्या तिमाहीत एसबीआयचे एकूण उत्पन्न, 76,027.51 कोटी रुपये होते. तर 2018-19 च्या याच तिमाहीत 75,670.5 कोटी रुपये होते. 2019-20 च्या मार्च तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा 3,580.81 कोटी होता.