नवी दिल्ली - सेल या सरकारी स्टील निर्मिती करणाऱ्या कंपनीला डिसेंबर अखेरच्या तिसऱ्या तिमाहीत १,४६८ कोटी रुपयांचे निव्वळ नफा मिळाला आहे. मागील आर्थिक वर्षात डिसेंबर अखेरच्या तिमाहीत सेलला ३४३.५७ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
सेलचे उत्पन्न ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीत १६,७१४.८७ कोटी रुपयांवरून १९,९९७.३१ कोटी रुपये झाले आहे. तर खर्चाचे प्रमाण हे १७,३१२.६४ कोटी रुपयांवरून १६,४०६.८१ कोटी रुपये झाले आहे. सेलने ४.३७ दशलक्ष टन कच्च्या स्टीलचे उत्पादन घेतले आहे. हे प्रमाण मागील आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत ९ टक्क्यांनी अधिक आहे. कंपनीने डिसेंबरच्या तिमाहीत क्रीयोग्य ४.१५ मेट्रिक स्टीलचे उत्पादन घेतले आहे. हे उत्पादन गतवर्षीच्या डिसेंबरच्या तिमाहीहून ६ टक्क्यांनी अधिक आहे.
हेही वाचा-पंतप्रधानांकडून सर्वपक्षीय बैठक बोलाविली जाणार असल्याची शक्यता
आव्हाने असतानाही कंपनीची चांगली कामगिरी-
सेलचे चेअरमन सोमा मोंडाल म्हणाले की, सेलने आव्हाने असतानाही चालू आर्थिक वर्षात सर्वच बाबींमध्ये चांगली कामगिरी केली आहे. संधींवर लक्ष केंद्रित करत कंपनीने सेवांमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे टाळेबंदी खुली झाल्यानंतर मागणीत वाढ झाली आहे. सेल ही केंद्रीय स्टील मंत्रालयांतर्गत असलेली कंपनी आहे. ही कंपनी दरवर्षी २१ दशलक्ष टन स्टीलचे उत्पादन घेते.
हेही वाचा-'स्पूटनिक व्ही' मार्चमध्ये लाँच करण्याचा डॉ. रेड्डीजचा प्रयत्न