ETV Bharat / business

उबेरसह ओलाच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण आणा; स्वदेशी जागरण मंचची मागणी

author img

By

Published : Sep 18, 2019, 1:01 PM IST

मुंबईमध्ये ६ मिनिटांच्या प्रवासासाठी २ हजार रुपये आकारल्याचा स्क्रीनशॉट मिळाला आहे. ओला व उबेरच्या प्लॅटफॉर्ममधून जास्त भाडे आकारण्यात येत असल्याकडे स्वदेशी जागरण मंचने लक्ष वेधले आहे.

संग्रहित - अश्वनी महाजन

नवी दिल्ली - टॅक्सी अॅग्रीगेटर असलेल्या ओला व उबेरकडून आकारण्यात येणाऱ्यावर भाड्यावर नियंत्रण आणा, अशी मागणी स्वदेशी जागरण मंचने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. स्वदेशी जागरण मंच ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत आहे. या संघटनेचे अध्यक्ष अश्विनी महाजन यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी यांना पत्र लिहिले आहे

स्वदेशी जागरण मंच संघटनेचे अध्यक्ष अश्वनी महाजन यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री गडकरी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी ओला व उबेरची कमी दरातील सेवा २०१४-१५ पासून सुरू झाल्याचे म्हटले आहे. मुंबईमध्ये ६ मिनिटांच्या प्रवासासाठी २ हजार रुपये आकारल्याचा स्क्रीनशॉट मिळाला आहे. हा धक्कायदायक प्रकार असून या प्लॅटफॉर्ममधून जास्त भाडे आकारण्यात येत असल्याकडे स्वदेशी जागरण मंचने लक्ष वेधले आहे.

हेही वाचा- 'अॅमेझॉनसह फ्लिपकार्टच्या मोठ्या ऑफर बंद करा, अन्यथा न्यायालयात जावू'

देशभरातील ग्राहकांना ओला व उबेरच्या अॅपमुळे अडचणी येत असल्याचे सर्व्हेतून दिसल्याचे महाजन यांनी म्हटले. बुक केलेले वाहन कंपनीकडून अथवा वाहन चालककडून कधी कधी रद्द करण्यात येते. अशावेळी ग्राहकाला १०० रुपये अथवा एकूण भाड्याच्या २० टक्के रक्कम द्यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.

हेही वाचा-शेअर बाजार निर्देशांकात २०० अंशाची घसरण; ऊर्जा कंपन्यांचे सावरले शेअर

टॅक्सी अॅग्रीगेटरसाठी मोटर वाहन अधिनियम कायदा २०१९ कायद्यानुसार कारवाई करावी, अशी संघटनेने विनंती केली आहे. जर हा कायदा लागू होत नसला तर राज्य सरकार स्वतंत्र कायदा करतील, असा इशाराही त्यांनी दिला. स्वदेशी जागरण मंचने पत्राची प्रत ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिली आहे. संघटनेने यापूर्वीही सरकाच्या काही धोरणांना विरोध केला आहे.

हेही वाचा-वाहन उद्योगात मंदी नाही; व्यापारी संघटना सीएआयटीचा दावा

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.