मुंबई- पीएमसी बँकेच्या ठेवीदार आणि खातेदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पंजाब महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेचे (PMC) दिल्लीमधील युनिटी स्मॉल फायनान्स(Unity Small Finance Bank) बँकेत विलिनीकरण करण्याकरिता आराखडा योजना तयार केली आहे.
पीएमसी बँकेचे युनिटी स्मॉल फायनान्स ( USFB) बँकेत विलिनीकरण केल्यानंतर (RB draft amalgamation of PMC) पीएमसी बँकेची (PMC Bank) मालमत्ता आणि जबाबदारी ही सर्वस्वी ही युनिटी स्मॉल फायनान्सकडे येणार आहे. त्याचबरोबर पीएमसीच्या ठेवीही युनिटी स्मॉल फायनान्सकडे येणार आहेत. त्यामुळे ठेवीदारांच्या हक्कांचे संरक्षण होईल, असे आरबीआयने म्हटले आहे.
संबंधित बातमी वाचा-पीएमसी बँक तोडगा : आरबीआयकडून सेंट्रमला लघू वित्त बँक स्थापण्याची परवानगी
आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विलिनीकरणासाठी 200 कोटी रुपयांच्या भांडवलाची गरज आहे. प्रत्यक्षात युएसएफबी ही 1,100 कोटी रुपयांचे भांडवल उभे करणार आहे. पीएमसी बँकेच्या विलिनिकरणासाठी तयार केलेल्या आराखडा योजनेवर आरबीआयने 10 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजेपर्यंत सूचना आणि आक्षेप (invited suggestions on the RBI draft) मागविले आहेत. युनिटी स्मॉल फायनान्स बँक ही सेंट्रम ग्रुप (Centrum Group) आणि भारतपे (Bharatpe) या दोन्ही कंपन्यांनी स्थापन केलेली बँक आहेत. ही स्मॉल फायनान्स बँक 1 नोव्हेंबर 2021 पासून कार्यरत सुरू झाली आहे.
संबंधित बातमी वाचा-PMC BANK वरील निर्बंधात आरबीआयकडून ३१ डिसेंबरपर्यंत वाढ
पीएमसीच्या विलिनीकरणचा मार्ग मोकळा
भारतीय रिझर्व्ह बँकेने पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवरील निर्बंध ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत (restrictions on pmc bank) वाढविले आहेत. बँकेची पुनर्रचना करण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन ही निर्बंधाची संपणारी मुदत आणखी वाढविली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवरील निर्बंधात वाढ करून ३० जूनपर्यंत निर्बंध वाढविले होते.
पीएमसी बँकेच्या गुंतवणुकदारांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक संकटात सापडलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेला (पीएमसी) ताब्यात घेण्याकरिता सेंट्रम फायनान्शियल सर्व्हिसेसचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण, भारतीय रिझर्व्ह बँकेने सेंट्रम फायनान्शियल सर्व्हिसेसला स्मॉल फायनान्स बँक (एसएफबी) स्थापन करण्याची जूनमध्ये तत्वत: मान्यता दिली आहे.
पीएमसी बँकेची पुनर्रचना करण्याचे प्रयत्न सुरू-
भारतीय रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवरील निर्बंधात वाढ करून ३० जूनपर्यंत निर्बंध वाढविले होते. शक्य तेवढे उत्कृष्ट प्रयत्न करून पीएमसी बँकेची पुनर्रचना करण्यात येईल, असे आरबीआयने यापूर्वीच म्हटले आहे. पीएमसी बँकेची पुनर्रचनेकरिता काही गुंतवणुकदारांनी तयारी दर्शविली आहे.
काय आहे घोटाळा-
पीएमसी बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि संचालकांनी ऑगस्ट २००८ ते २०१९ या कालावधीत भांडूपमधील पीएमसी बँकेतील ठराविक खात्यांची मोठ्या कर्जांची परतफेड होत नसताना ती खाती आरबीआयपासून लपवली होती. कमी कर्ज रकमेचा बनावट कर्ज खात्यांचा खोटा व बनावट अभिलेख तयार करून ती माहिती रिझर्व्ह बँकेला सादर केली. त्यामुळे बँकेला ४३५५.४६ कोटी रुपयांचे नुकसान झाले. त्या पैशातूनच हा सर्व गैरव्यवहार करण्यात आला. हा सर्व गैरव्यवहार करण्यात हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लि. ग्रुप ऑफ कंपनीचा पुढकार होता. त्यांनी बँकेच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून संगनमत करून गुन्हेगारीचा कट रचला आहे. कर्जाची परतफेड न करता कर्ज रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत बँकेची फसवणूक करण्यात आली.