ETV Bharat / business

राजस्थानात ईडीचा दणका; मुख्यमंत्री गेहलोत यांच्या भावाच्या मालमत्तेवर छापे - fertiliser scam in Rajsthan

ईडीने अग्रसेन गेहलोत यांच्या मालकीच्या 13 ठिकाणी देशाच्या विविध भागात छापे मारले आहेत. यामध्ये राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात आणि दिल्लीचा समावेश आहे.

संग्रहित
संग्रहित
author img

By

Published : Jul 22, 2020, 2:17 PM IST

जयपूर – राजस्थानमध्ये सरकारवर अस्थिरतेची टांगती तलवार असतानाच सक्त अंमलबजावणी संचालनालयही (ईडी) सक्रिय झाली आहे. ईडीने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे भाऊ अग्रसेन गेहलोत यांच्या कार्यालयांवर छापे मारले आहेत. खत घोटाळ्यातील मनी लाँड्रिगच्या प्रकरणात अग्रसेन यांचा सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे.

ईडीने अग्रसेन गेहलोत यांच्या मालकीच्या 13 ठिकाणी देशाच्या विविध भागात छापे मारले आहेत. यामध्ये राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात आणि दिल्लीचा समावेश आहे. खताच्या व्यवसायात उत्पादन शुल्काच्या प्रकरणात अग्रसेन यांच्यावर 7 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. अग्रसेन यांच्या जोधपूरमधील मालमत्तेवरही ईडीने छापे टाकले आहेत.

ईडीने अग्रसेन गेहलोत यांच्या मालकीच्या राजस्थानमधील सहा ठिकाणी, गुजरातमधील 6 ठिकाणी, पश्चिम बंगालमधील 2 ठिकाणी तर दिल्लीमधील एका मालकीच्या ठिकाणी छापे टाकले आहेत. अग्रसेन यांच्या मालकीची अनुपम कृषी ही कंपनी आहे.

दरम्यान, यापूर्वी ईडीने गेहलोत यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मालमत्तेवरही छापे मारले आहेत. काँग्रेसच्या सत्ता असलेल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा फडकाविल्यानंतर राजस्थानमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशातच ईडीने छापे टाकल्याने राजस्थानमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.