हैदराबाद – भारतीय रेल्वेने मालवाहू सेवेच्या बाजारपेठेत हिस्सा वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दक्षिण केंद्रीय रेल्वे (एससीआर) 5 ऑगस्टपासून पहिली मालवाहू एक्सप्रेस रेल्वे हैदराबाद ते नवी दिल्ली सुरू करमार आहे..
एससीआरची पहिली मालवाहू रेल्वे ही दर आठवड्याला नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहे. ही मालवाहू रेल्वे हैदराबादमधील समर्थ नगर ते नवी दिल्लीतील आदर्श नगरपर्यंत धावणार आहे. हा पथदर्शी प्रकल्प म्हणून एससीआर सहा महिन्यांसाठी चालवणार आहे. ही मालवाहू रेल्वे दर बुधवारी सुरू राहणार आहे.
सामान्यत: मालवाहू रेल्वे ही मोठ्या प्रमाणात असलेल्या मालासाठी सेवा देते. या सेवेत संपूर्ण मालवाहू रेल्वे ग्राहकाला भाड्याने घ्यावे लागते. मात्र, सध्या कमी प्रमाणात असलेल्या मालाच्या वाहतुकीची मागणी वाढली आहे. हे लक्षात घेता रेल्वेने मालवाहू एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
अशी सुरू राहणार मालवाहू एक्सप्रेस रेल्वे
मालवाहू एक्सप्रेस रेल्वेत विविध ग्राहकांना माल वाहतूक करता येणार आहे. कमी खर्च व सुरक्षित माल राहत असल्याने ग्राहकांचा फायदा होणार आहे. हैदराबाद ते नवी दिल्लीमधील 1 हजार 700 किमीचे अंतर रेल्वे 34 तासात पूर्ण करणार आहे. या मालवाहू रेल्वेचा वेग प्रति ताशी 50 किमी असणार आहे. हैदराबाद ते नवी दिल्लीमधील 1 हजार 700 किमीचे अंतर रेल्वे 34 तासात पूर्ण करणार आहे. या मालवाहू रेल्वेचा वेग प्रति ताशी 50 किमी असणार आहे. मालवाहू रेल्वेत प्रति टन मालासाठी सुमारे 2,500 रुपये खर्च लागणार आहे. हा दर इतर रस्ते वाहतुकीच्या खर्चांहून 40 टक्क्यांनी कमी आहे.
दरम्यान, कोरोना महामारीमुळे देशातील बहुतांश रेल्वे सेवा बंद आहे. प्रवासी सेवा बंद असल्याने रेल्वेचे आर्थिक उत्पन्न बुडत असताना मालवाहू रेल्वे हा सरकारला उत्पन्नाचा नवा स्त्रोत ठरणार आहे.