ETV Bharat / business

अलिबागच्या हर्षलची 'गुगल'कडून दखल; अपघात रोखणारे रेल्वे मॉडेल केले विकसित - हर्षल जुईकर एआय तंत्रज्ञान न्यूज

रेल्वे प्रशासनाकडून अपघात टाळण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र तरीही अपघात टाळता येत नाहीत. हे टाळण्यासाठी अलिबागच्या हर्षल मंगेश जुईकर या विद्यार्थ्याने कृत्रिम मानवी बुद्धिमत्ता (आर्टिफिशल इंटेलिजन्स) असलेले रेल्वे प्रोजेक्ट मॉडेल तयार केले आहे.

हर्षल जुईकर
हर्षल जुईकर
author img

By

Published : Sep 8, 2020, 3:58 PM IST

Updated : Sep 8, 2020, 5:40 PM IST

रायगड - अलिबागच्या हर्षल जुईकरने आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर केलेले रेल्वे मॉडेल तयार केले आहे. त्यामुळे रेल्वे अपघात टळू शकतील, असे त्याचे म्हणणे आहे. या मॉडेलची दखल घेत गुगलने हर्षलला शिष्यवृत्ती दिली आहे. केंद्र सरकारनेही आत्मनिर्भर योजनेअंतर्गत हर्षलकडून मॉडेल मागविले आहे.

रेल्वे अपघातात अनेकांचा जीव जाऊन संसार उद्ध्वस्त होतात. रेल्वे विभागालाही आर्थिक फटका बसतो. रेल्वे प्रशासनाकडून अपघात टाळण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र तरीही अपघात टाळता येत नाहीत. हे टाळण्यासाठी अलिबागच्या हर्षल मंगेश जुईकर या विद्यार्थ्याने कृत्रिम मानवी बुद्धिमत्ता (आर्टिफिशल इंटेलिजन्स) असलेले रेल्वे प्रोजेक्ट मॉडेल तयार केले आहे.

अपघात रोखणारे रेल्वे मॉडेल केले विकसित

हे आहे तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य-

जगात सिंगल रेल्वे ट्रॅकवर चालविणारी यंत्रणा ही मोनोरेल व बुलेट ट्रेनमध्ये वापरली जात आहे. मात्र मल्टिपल रेल्वेसाठी अशी कोणतीही यंत्रणा अद्यापपर्यंत तयार केली नव्हती. ती हर्षलने विकसित केली आहे. हर्षलच्या या मॉडेलने रेल्वे अपघात टाळणे शक्य होणार आहे.

अलिबाग शहरात राहणारा हर्षल जुईकर हा जे. एस. एम. कॉलेजमध्ये संगणक शास्त्राच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. हर्षलला पहिल्यापासून संगणकामध्ये आवड असल्याने त्याने स्वतः डेटा सर्व्हर बनविले आहेत. भारतात रेल्वे अपघात होत असल्याने अनेकांचे जीव जातात. त्याचा रेल्वेसह अपघातग्रस्त प्रवाशांना आर्थिक फटकाही बसतो. त्यामुळे रेल्वे अपघात टाळता येऊ शकतील का, असा प्रश्न हर्षलच्या मनात आला. त्यानुसार हर्षलने एक सॉफ्टवेअर तयार करण्याचे मनाशी ठरविले. यासाठी महाविद्यालयाच प्राचार्य डॉ. अनिल पाटील, आयटी विभाग प्रमुख प्राध्यापक सुरेंद्र दातार, आयटी शिक्षक सत्यजित तुळपुळे, सचिन भोस्तेकर, चैताली चौधरी, अवती जोगळेकर व आई-वडील यांचे मार्गदर्शन घेतले.

सौर उर्जेवर चालू शकते मॉडेल

हर्षलने चर्चगेट येथे जाऊन स्टेशन मास्टर, टीसी, मोटरमन व रेल्वेच्या कंट्रोल रूमला भेट देऊन माहिती गोळा केली. त्यानंतर त्याने आर्टिफिशल इंटेलिजन्स रेल्वे मॉडेल तयार केले. हर्षलने तयार केलेले मॉडेल हे चालकाविना धावणारी रेल्वे नियंत्रित करू शकणारे आहे. विशेष म्हणजे, हर्षलने विकसित केलेले मॉडेल लोकल रेल्वेसाठी आणि मल्टी रेल्वेसाठी उपयुक्त आहे. हे मॉडेल तयार करण्यासाठी इटली येथून सेन्सर आणून त्याने ते स्वतः विकसित केले आहे. तसेच हे मॉडेल रेल्वे सोलर व पवन उर्जेवर चालणारे आहे.

मॉडेलमध्ये आंतरराष्ट्रीय निकषानुसार ट्रिपल सेफ्टी यंत्रणा-

हर्षलने तयार केलेले मॉडेल हे विनाचालक रेल्वेसाठी उपयुक्त आहे. रेल्वे ट्रकवर एक किमीवर होणाऱ्या दुर्घटनेची माहिती त्वरित या मॉडेलद्वारे कळणार आहे. त्यामुळे अपघात टाळणे शक्य होणार आहे. या मॉडेलमध्ये आंतरराष्ट्रीय निकषानुसार ट्रिपल सेफ्टी यंत्रणा वापरली आहे. अंधार पडल्यानंतर आपोआप वीज सुरू होण्याची यंत्रणाही या मॉडेलमध्ये बसवली आहे.

जगात पहिलेच मॉडेल असल्याचा दावा-

हर्षलने तयार केलेल्या मॉडेलने गुगलने घेतलेल्या परीक्षेत देशात दुसरा क्रमांक मिळविला आहे. यासाठी हर्षलला गुगलची फेलोशिप मिळाली आहे. त्याच्या शिक्षणाचा खर्च हा गुगल करणार आहे. केंद्र सरकारच्या आत्मनिर्भर भारतसाठीही त्याचे हे मॉडेल रेल्वे मंत्रालयाने मागवून घेतले आहे. हर्षलने तयार केलेल्या या मॉडेलचा वापर रेल्वेमध्ये केल्यास त्याचा मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे होणारे अपघात, जीवितहानी व आर्थिक नुकसान टळून वेळेची बचत होण्यास मदत मिळणार आहे. अपघात रोखण्यासाठी तयार केलेले हे मॉडेल जगातील पहिलेच असल्याचा दावाही हर्षलने केला आहे.

Last Updated : Sep 8, 2020, 5:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.