ETV Bharat / business

पंतप्रधानांच्या उपस्थितीने मिळाले प्रोत्साहन- झायडस कॅडिला कंपनीची प्रतिक्रिया - corona vaccine Zydus Cadila

पंतप्रधान मोदी यांनी अहमदाबादजवळील झायडस कॅडिलाच्या उत्पादन प्रकल्पाला आज भेट दिली आहे. कोरोनाच्या लसीच्या प्रगतीची माहिती घेण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे शहराला भेट देत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : Nov 28, 2020, 5:10 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज झायडस बायोटेक पार्कमधील झायडस कॅडिलामध्ये उपस्थित राहिले होते. त्यांच्या उपस्थितीने आरोग्य क्षेत्रातील गरजेची मोठ्या प्रमाणात पूर्तता करण्यासाठी प्रोत्साहन मिळाल्याचे कंपनीने म्हटले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी अहमदाबादजवळील झायडस कॅडिलाच्या उत्पादन प्रकल्पाला आज भेट दिली आहे. कोरोनाच्या लसीच्या प्रगतीची माहिती घेण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते अहमदाबाद, हैदराबाद आणि पुणे शहराला भेट देत आहेत.

पंतप्रधानांच्या उपस्थितीने मोठ्या प्रमाणात आरोग्य क्षेत्रातील गरजेची पूर्तता करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे. ही माहिती झायडस कॅडिलाने शेअर बाजाराला दिली आहे. झायडस कुटुंबातील २५ हजार झायडन्स (कर्मचारी) हे आत्मनिर्भर भारतच्या अभियानासाठी बांधील आहेत. देशाला सुरक्षित आणि परिणामकारक लस तसेच थॅरपेटिक, डायग्नोस्टिक्स दिली जाणार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा-झायडस कॅडिलाकडून झायकोव्ही-डी औषधाच्या पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या पूर्ण

पहिली चाचणी ठरली यशस्वी-

दरम्यान, कोरोनावरील झायकोव्ही-डी या लसीच्या चाचणीचा पहिल्या टप्पा पूर्ण झाल्याचे झायडस कॅडिलाने नुकतेच जाहीर केले आहे. तर दुसरा टप्पा हा ऑगस्टपासून सुरू झाला आहे. कोविड-१९ ला रोखण्यासाठी त्यांनी विकसित केलेली प्लाझ्मिड डीएनए लस पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांमध्ये सुरक्षित असल्याचे आढळले आहे. तिचा स्वयंसेवकांवर कोणताही विपरित परिणाम आढळून आला नाही. कंपनीने आता दुसऱ्या टप्यातील क्लिनिकल चाचण्या आजपासून सुरू केल्या आहेत. १५ जुलै २०२० रोजी पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या सुरू झाल्या असून सुदृढ स्वयंसेवकांवर या लसीचा कोणताही विपरित परिणाम दिसलेला नाही.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. कोरोना व्हायरसवरच्या लसनिर्मितीची प्रक्रिया कुठेपर्यंत आली याची पाहणी ते करणार आहेत.

हेही वाचा-अहमदाबाद-हैदराबाद-पुणे, असा असेल पंतप्रधान मोदींचा कोरोना व्हॅक्सिन दौरा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.