नवी दिल्ली - पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली आहे. गेल्या तीन दिवसात नवी दिल्लीत पेट्रोल ४४ पैशांनी कमी झाले आहे. तर डिझेलत ४५ पैशांनी कमी झाले आहे.
खनिज तेल विपणन कंपन्यांनी दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईत पेट्रोलचे दर १५ पैशांनी कमी केले आहेत. तर दिल्ली आणि कोलकात्यात १६ पैशांनी डिझेलचे दर कमी केले आहेत. मुंबई आणि चेन्नईत डिझेलचे दर १६ पैशांनी कमी केले आहेत.
हेही वाचा-'रिलायन्स' पेट्रोकेमिकल व्यवसायामधील १ लाख कोटींचा हिस्सा ३१ मार्चपर्यंत विकणार
इंडियन ऑईल वेबसाईटच्या आकडेवारीनुसार दिल्लीत पेट्रोल ७५.२६ रुपये प्रति लिटर आहे. तर कोलकात्यात ७७.८५ रुपये, मुंबईत ८०.८५ रुपये आणि चेन्नईत ७८.९९ रुपये प्रति लिटर पेट्रोल आहे.
हेही वाचा-देशातील 'या' प्रमुख उद्योजकांची अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी घेतली भेट
दिल्लीत डिझेलचा दर प्रति लिटर ६८.६१ रुपये आहे. तर डिझेलचा दर कोलकात्यात ७०.९७ रुपये, मुंबईत ७१.९४ रुपये आणि चेन्नईत ७२.५० रुपये आहे.