नवी दिल्ली - सरकारी तेल कंपन्यांनी सलग नवव्या दिवशी पेट्रोल व डिझेलचे दर 'जैसे थे' ठेवले आहेत. विशेष म्हणजे, जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ७० डॉलर आहेत. तरीही सरकारी तेल कंपन्यांकडून इंधनाच्या किमतीत दरवाढ झालेली नाही.
इंधनाचे दर स्थिर असल्याने दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ९१.१७ रुपये आहेत. तर डिझेलचे दर प्रति लिटर ८१.४७ रुपये आहेत. देशभरात पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर राहिले आहेत. गेल्या दोन आठवड्यात जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ६७ डॉलरपर्यंत पोहोचले आहेत. त्यानंतर देशातील पेट्रोल व डिझेलच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे.
हेही वाचा-महाराष्ट्र अर्थसंकल्प : राज्याच्या अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्राचा आधार - श्रीनिवास खांदेवाले
ओपेक आणि ओपेक प्लस या कच्च्या तेलाच्या उत्पादक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ६७ डॉलरहून ७० डॉलपर्यंत पोहोचले आहेत.
हेही वाचा-महिला दिन विशेष : नंदुरबारच्या दुर्गम भागात होडीतून प्रवास करून 'ती' पोहचवते पोषण आहार
चालू वर्षात इंधनाची तब्बल २६ वेळा दरवाढ!
- चालू वर्षात तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर २६ वेळा वाढले आहेत. या दरवाढीनंतर पेट्रोल प्रति लिटर ७.४६ रुपयांनी तर डिझेल प्रति लिटर ७.६० रुपयांनी महागले आहे.
- सरकारी तेल विपणन कंपनीमधील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती येत्या काही दिवसात पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
- जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत असताना तोट्याचे प्रमाण कमी करण्यासाठी तेल कंपन्यांकडून इंधनाचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-नागपूर: एमआयडीसी परिसरात विको कंपनीला आग; अग्नीशमन दलाचे प्रयत्न सुरू
दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरीच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला आहे. या पार्श्वभूमीवर इंधनाचे दर वाढू नये, यासाठी केंद्रातील मोदी सरकारकडून प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात आहे.