ETV Bharat / business

सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

इंधनाचे दर स्थिर ठेवण्यापूर्वी गुरुवारी आणि शुक्रवारी इंधनाचे दर प्रति लिटर ६५ पैशांनी वाढले होते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर १.३ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ६० डॉलर झाल्यानंतर इंधनाचे दर दुसऱ्या दिवशीपासून स्थिर राहिले आहेत.

पेट्रोल किंमत न्यूज
पेट्रोल किंमत न्यूज
author img

By

Published : Feb 8, 2021, 3:19 PM IST

नवी दिल्ली- पेट्रोल आणि डिझेलचे दर सलग तिसऱ्या दिवशी स्थिर राहिले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले असले तरी सरकारी तेल कंपन्यांनी 'थांबा आणि वाट पाहा'चे धोरण स्वीकारल्याचे दिसत आहे.

इंधनाचे दर स्थिर ठेवण्यापूर्वी गुरुवारी आणि शुक्रवारी इंधनाचे दर प्रति लिटर ६५ पैशांनी वाढले होते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर १.३ टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल ६० डॉलर झाल्यानंतर इंधनाचे दर दुसऱ्या दिवशीपासून स्थिर राहिले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीप्रमाणे कच्च्या तेलाचे दर सरकारी तेल कंपन्यांकडून बदलण्यात येतात. दिल्लीत डिझेलचे दर प्रति लिटर ७७.१३ रुपये तर पेट्रोलचे दर ८६.९५ रुपये प्रति लिटर आहेत.

हेही वाचा-केंद्र सरकार आणणार नवे ई-कॉमर्स धोरण

नव्या वर्षात १२ वेळा इंधनाच्या दरात वाढ-

  • सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गेल्या काही आठवड्यांपासून वाढण्यास सुरुवात झाली आहे.
  • २०२१ मध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर हे १२ वेळा वाढविण्यात आले आहेत.
  • पेट्रोलची किंमत प्रति लिटर ३.२४ रुपये प्रति लिटर तर डिझेलची किंमत प्रति लिटर ३.२६ रुपये प्रति लिटरने वाढविण्यात आली आहे.

सरकारी तेल कंपन्यांमधील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढू शकतात.

हेही वाचा-पीएमसी बँकेत गुंतवणुकीसाठी मिळाले तीन प्रस्ताव-आरबीआय गव्हर्नर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.